आजकाल फास्ट फुड भरपूर खाल्ले जाते. अनेक पदार्थ आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. तरी आपण ते खातोच. सगळेच पदार्थ त्रासदायक ठरत नाहीत. (Who should avoid eating all purpose flour? Is eating Maida really dangerous for health? health tips )काही ठराविक पदार्थ असतात जे खाणे टाळायलाच हवेत. जसे की मैदा. मैद्याचे पदार्थ चवीला अगदी मस्त असतात. त्यामुळे अनेक जण मैदा फार आवडीने खातात. मैदा पोटासाठी अजिबात चांगला नसतो. आपण रोज बेकरी उत्पादने, पिझ्झा, बिस्किटे, केक आणि इतर अनेक तळणीचे पदार्थ लोक नियमित खातात. या पदार्थांमध्ये भरपूर मैदा असतो. मैदा चवीला जरी छान असला तरी त्यात शरीरासाठी उपयुक्त असे काही नसते.
मैदा म्हणजे काय ?
मैदा गव्हाच्या पीठाचा केलेला असतो म्हणून आरोग्यासाठी चांगला असेल असे अनेकांना वाटते. मात्र गव्हाच्या दाण्याची चांगली सत्व काढून टाकली जातात. गव्हाची सालं काढून टाकतात आणि आतील केवळ पांढऱ्या भागाचे बारीक पीठ म्हणजे मैदा. हा पांधरा मऊसूत आणि गुळगुळीत मैदा आरोग्यासाठी काहीच फायद्याचा नसतोच. मात्र त्याच बरोबर शरीरासाठी अपायकारक ठरू शकतो. मैद्याचमुळे काही त्रास होतात.
१. मैद्यामुळे पित्त वाढते. तसेच गॅसेसचे प्रमाण वाढते. पोट साफ होत नाही. मैदा पोटात साठून राहतो. अडकून राहतो आणि त्यामुळे शी-शू सगळ्यासाठीच त्रास होतो.
२. मैद्यामध्ये भरपूर प्रमाणात कॉलरिज असतात. कॅलरिजमुळे वजन अगदी झपाट्याने वाढते. मैद्यामुळे वजन फारच झटपट वाढते आणि चरबीचे प्रमाण वाढत जाते. इतरही आजार उद्भवतात. वजन कमी करण्यासाठी जर प्रयत्न करत असाल तर मैद्याला हातही लाऊ नका.
३. मैद्यामुळे टाईप २ या डायबिटीजचा धोका वाढतो. मैद्यामुळे शरीरातील साखरेची पातळ वर-खाली होते. त्यामुळे मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी अजिबात मैदा खाऊ नये.
४. मैद्यामुळे शरीरातील कॅलरिज तर वाढतातच मात्र ट्रायग्लिसराइड्स चे प्रमाणही वाढते. हृदयाच्या आरोग्यासाठी ते चांगले नाही. त्यामुळे हृदयाच्या विकारांची शक्यता वाढते.
५. मैद्यामुळे त्वचेचेही त्रास उद्भवतात. तसेच मैद्यामुळे सुस्ती वाढते. झोपेचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे आळस वाढतो. थकवा जाणवतो. पटकन मैदा पचत नाही त्यामुळे सगळ्याच संस्थांवर परिणाम होतो.