लिंबात एंटी ऑक्सिडेंट्स, व्हिटामीन्स, मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. लिंबाच्या सेवनानं वजन कमी करण्यासही मदत होते. तसंच लिंबाच्या सेवनानं त्वचा आणि केस चांगले राहतात. बरेच लोक सकाळी लिंबू पाण्याचं सेवन करतात (When Should Avoid Lemon Water). सकाळी लिंबू पाणी पिण्याची सवय नेहमी योग्य नसते. या सवयीमुळे तुमचं लिव्हरही खराब होऊ शकतं. डॉक्टर सलिम जैदी सांगतीत की रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिणं ही हेल्दी सवय आहे. पण प्रत्येकासाठीच हे योग्य नाही. (Who And When Should Avoid Lemon Water Empty Stomach That Can damage Your Liver)
कोणत्या समस्या असल्यास लिंबू पाणी पिऊ नये
जर कोणालाही ॲसिडिटी, लिव्हर कमकुवत होणं, दातांमध्ये झिनझिण्या अशा समस्या असतील तर रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिऊ नये. कारण अत्याधिक सिट्रिक ॲसिड तब्येतीचं नुकसानकरू शकते. यामुळे दातांचे इनॅमल हळूहळ डॅमेज होते. जे लोक रोज लिंबू पाणी पितात त्यांच्या आरोग्याला धोका असतो.
जेवताना १ चमचा ही चटणी खा; वजन भराभर कमी होईल-हाडं राहतील बळकट, चटणीची सोपी रेसिपी
रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिऊ नये. ज्यांना किडनीची समस्या आहे त्या लोकांनी लिंबू पाणी पिणं टाळायला हवं. यामुळे किडनीवर दबाव पडतो. ज्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. क्रोनिक किडनी डिसिज असल्यास लिंबू पाणी पिणं टाळायला हवं.
लिव्हर खराब होऊ शकते
डॉक्टरांनी सांगितले की लिंबाचे ॲसिड लिव्हर फंक्शन वाढवते जे सामान्य व्यक्तीसाठी योग्य नाही. पण जर लिव्हर कमकुवत किंवा आजारी असेल तर दबाव वाढ लागतो. जर डायजेशन आणि लिव्हर डिटॉक्स सिस्टम दोन्ही कमकुवत असेल तर लिव्हर डॅमेज होऊ शकते.
मनुक्यांचे पाणी कधी प्यावे
जर तुम्हाला ॲसिडिटी किंवा सेंसिटिव्ह दातांची समस्या असेल तर तुम्ही लिंबू पाण्याऐवजी दुसरा उपाय करू शकता. रात्रभर मनुके पाण्यात भिजवून याचे पाणी प्या. सकाळी रिकाम्या पोटी हे प्यायल्यानं लिव्हर डिटॉक्स होते आणि ॲसिडिटीची समस्या उद्भवत नाही.