चण्याच्या डाळीत बरेच पोषक तत्व असतात. हेल्थ एक्सपर्ट्सच्यामते चण्याची डाळ तब्येतीसाठी वरदान ठरते. या डाळीत प्रोटीन्स, फायबर, कॅल्शियम, जिंक, फॉलेट आणि आयर्न आणि पोषक तत्व असतात. चण्याच्या डाळीत कोणते व्हिटामीन्स असतात समजून घेऊ. चण्याच्या डाळीच्या सेवनानं तब्येतीला फायदे मिळतात. चण्याची डाळ शिजवण्याची पद्धत सु्द्धा महत्वाची असते. तुम्ही पदार्थ कोणत्या पद्धतीनं शिजवता त्यावर फायदे अवलंबून असतात. (Which Vitamin Is Found In chickpea Lentils Or Chana Dal)
पोषक तत्वांचे भंडार आहे चण्याची डाळ
चण्याच्या डाळीत व्हिटामीन बी कॉम्पलेक्सचे प्रमाण जास्त असते. चण्याच्या डाळीत व्हिटामीन बी-१, व्हिटामीन बी-२, व्हिटमीन बी-३ आणि व्हिटामीन बी-९ असते. याव्यतिरिक्त चण्याच्या डाळीत व्हिटामीन ए आणि व्हिटामीन सी असते. इतकंच नाही तर व्हिटामीन ई सुद्धा यात भरपूर असते. जर तुम्हाला एनर्जी लेव्हल वाढवायची असेल तर चण्याच्या डाळीचे सेवन आवर्जून करायला हवे. हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते चण्याची डाळ मेटाबॉलिझ्म सुधारण्यास मदत करते. याशिवाय इम्युन सिस्टिम चांगली राहते. योग्य प्रमाणात खाल्ल्यास तब्येत चांगली राहण्यासही मदत होते.
डोळ्यांसाठीही चणे खाणं उत्तम मानलं जातं. हाडांना मजबूत ठेवण्यासाठी चण्याच्या डाळीचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठीसुद्धा चण्याची डाळ खाल्ली जाते. चण्याच्या डाळीतील पोषक तत्व ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास परिणामकारक ठरतात. गट हेल्थ सुधारण्यासाठी ही डाळ खाण्याचा सल्ला दिला जातो.
चण्याची डाळ कशी खावी?
चण्याची डाळ शिजवण्यापूर्वी ४ ते ६ तास भिजवून ठेवा. चण्यांमध्ये फायटेट्स नावाचे एंटीन्युट्रिएंट्स असतात जे भिजवल्यानं कमी होतात. ज्यामुळे डाळ पचायला हलकी होते, पोट फुगणं किंवा गॅसचा त्रास कमी होतो. भिजवल्यानं शरीराला डाळीतील प्रथिनं आणि इतर पोषक तत्व शोषून घेणं सोपं जातं.
भिजवलेली डाळ कमी वेळेत शिजते. शिजवता चिमूटभर हळद आणि हिंग वापरल्यास पचनक्रिया अधिक सुधारते. तयार डाळीत १ चमचा शुद्ध तूप घालून खाल्ल्यास डाळीतील पोषण मूल्य वाढते आणि जीवनसत्वे शोषली जातात.
