Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रात्रभर भरपूर झोप झाली तरी दिवसभर आळस, दुपारी डूलकी लागते? पाहा ‘असं’ का होतंय..

रात्रभर भरपूर झोप झाली तरी दिवसभर आळस, दुपारी डूलकी लागते? पाहा ‘असं’ का होतंय..

Can Lack of Vitamins Make You Sleepy:ज्या लोकांना झोप घेतल्यावरही झोप येत असेल त्या लोकांमध्ये व्हिटॅमिनची कमतरता असू शकते. अशात कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे सतत झोप येते हे जाणून घेऊ.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 20:21 IST2025-02-25T11:35:47+5:302025-02-25T20:21:56+5:30

Can Lack of Vitamins Make You Sleepy:ज्या लोकांना झोप घेतल्यावरही झोप येत असेल त्या लोकांमध्ये व्हिटॅमिनची कमतरता असू शकते. अशात कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे सतत झोप येते हे जाणून घेऊ.

Which vitamin deficiency causes excessive sleep | रात्रभर भरपूर झोप झाली तरी दिवसभर आळस, दुपारी डूलकी लागते? पाहा ‘असं’ का होतंय..

रात्रभर भरपूर झोप झाली तरी दिवसभर आळस, दुपारी डूलकी लागते? पाहा ‘असं’ का होतंय..

Can Lack of Vitamins Make You Sleepy: हेल्दी राहण्यासाठी पुरेशी आणि चांगली झोप घेणं खूप महत्वाचं असतं. जर झोप पूर्ण झाली नाही तर दिवसभर आळस येतो आणि पुन्हा पुन्हा झोप लागते. मात्र, काही लोकांना रात्री चांगली झोप झाल्यावरही दिवसा झोप येत राहते. बेडवर पडल्या पडल्या त्यांना लगेच झोप लागते. प्रमाणापेक्षा जास्त झोप येणं एखाद्या गंभीर समस्येचा संकेत असू शकतो. ज्या लोकांना झोप घेतल्यावरही झोप येत असेल त्या लोकांमध्ये व्हिटॅमिनची कमतरता असू शकते. अशात कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे सतत झोप येते हे जाणून घेऊ.

व्हिटॅमिन डी ची कमतरता

व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे शरीरात एनर्जी कमी होते, ज्यामुळे व्यक्तीला काही न करताही थकवा जाणवतो आणि झोप येते. व्हिटॅमिन डी कमी झालं तर हाडं आणि स्नायू कमजोर होतात, ज्यामुळे थकवा आणि आळस जाणवतो. यामुळे व्यक्तीला दिवसा सुद्धा झोप येते. व्हिटॅमिन डी कमतरता भरून काढण्यासाठी सूर्यप्रकाशात बसा आणि व्हिटॅमिन डी असलेले फळं आणि पदार्थ खा.

व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता

व्हिडॅमिन बी १२ शरीरात कमी झालं तर व्यक्तीला सतत थकवा जाणवतो. ज्यामुळे त्यांना सतत झोप येते. या व्हिटॅमिनमुळे बॉडी सेल्समध्ये एनर्जी जाते, हे कमी झालं तर थकवा, कमजोरी जाणवते आणि स्ट्रेसही वाढतो. हे व्हिटॅमिन मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांचा आहारात समावेश करा. 

व्हिटॅमिन सी ची कमतरता

व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळेही थकवा आणि कमजोरी जाणवू शकते. ज्यामुळे दिवसा तुम्हाला झोप येऊ शकते. व्हिटॅमिन सी एक अॅंटी-ऑक्सिडेंट आहे, जे शरीराच्या सेल्सला सुरक्षा देतं आणि एनर्जी कायम ठेवण्यास मदत करतं. हे व्हिटॅमिन कमी झालं तर शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवतो.

आयर्नची कमतरता

आयर्न कमी झाल्यानं एनीमिया होऊ शकतो, ज्यामुळे जास्त थकवा आणि झोप येते. आयर्न कमी झाल्यानं शरीरात ऑक्सीजनचा सप्लाय कमी होतो, ज्यामुळे थकवा आणि झोप येऊ लागते. शरीरात आयर्न कमतरता भरून काढण्यासाठी, पालक, डाली, बीन्स यांचा आहारात समावेश करावा.

मॅग्नेशिअमची कमतरता

मॅग्नेशिअमच्या कमतरतेमुळे मसल्स कमजोर होतात, थकवा जाणवतो आणि सतत झोपही येते. हे मिनरल शरीरात एनर्जीसाठी गरजेचं असतं आणि याच्या कमतरतेमुळे शरीर स्लो होतं. ज्यामुळे थकवा आणि कमजोरी जाणवते. हे मिनरल मिळवण्यासाठी पालेभाज्या, नट्स, बिया खाव्यात.

Web Title: Which vitamin deficiency causes excessive sleep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.