Join us

‘हे’ व्हिटामिन कमी म्हणून रोज दुखतेय तुमची कंबर! महिलांना सतत छळणारा त्रास, पाहा कारणं आणि उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 14:26 IST

Vitamin deficiency back pain : शरीरात कोणतं व्हिटामिन कमी झाल्यावर कंबरदुखीची समस्या होते हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

Vitamin deficiency back pain : कंबरदुखी ही एक फारच कॉमन समस्या आहे. जी लोकांच्या लाइफस्टाईलसंबंधी एक समस्या आहे. कधी जास्त काम केल्यामुळे तर कधी शरीरात काही व्हिटामिन कमी झाल्यामुळे ही समस्या होते. अशात शरीरात कोणतं व्हिटामिन कमी झाल्यावर कंबरदुखीची (Vitamin deficiency back pain) समस्या होते हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

कोणत्या व्हिटामिनच्या कमीमुळे कंबरदुखी होते?

शरीरात जर व्हिटामिन बी12 कमी झालं तर तुम्हाला कंबरदुखीची सामना करावा लागू शकतो. व्हिटामिन बी12 शरीरात कमी झाल्यावर शरीरात कमजोरी जाणवते आणि अंगदुखी किंवा कंबरदुखीची समस्या सतत डोकं वर वाढते. हे व्हिटामिन तुमच्या नर्व सेल्समध्ये एनर्जी वाढवण्याचं काम करतं. जेव्हा हे शरीरात कमी होतं तेव्हा सूज वाढते आणि यामुळे कंबरदुखीची समस्या होते. 

व्हिटामिन बी 12 कसं मिळवाल?

व्हिटामिन बी 12 ची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही डेअर प्रोडक्ट जसे की, दूध पिऊ शकता किंवा चीज खाऊ शकता. त्याशिवाय काही कडधान्य आणि ड्रायफ्रूट्समधूनही तुम्हाला हे व्हिटामिन मिळू शकतं.

कंबरदुखीची इतर कारणं

कंबरदुखीची इतरही काही कारणं असू शकतात. जसे की, थकवा आणि जास्त काम करणे. चुकीच्या पद्धतीनं जास्त वेळ एकाच जागी बसून काम करणे, चालणे. तसेच कंबरदुखी काही आजारांचा संकेतही असू शकते. टीबी किंवा नर्व संबंधित समस्यांमुळेही कंबरदुखी होते. अशात वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स