तेल शरीरासाठी नुकसानकारक मानलं जातं. ज्यामुळे कोलेस्टेरॉल वाढते. हृदयाचं नुकसान होऊ शकतं. याच कारणामुळे आजकाल बिना तेलाचं जेवण करण्याचा सल्ला दिला जातो. ही पद्धत इंटरनेटवर बरीच व्हायरल होत आहे. लोक बिना तेलाचा स्वंयपाक करणं पसंत करतात. 2 प्रकारची तेलं स्वंयपाकासाठी उत्तम ठरू शकतात. याचा योग्य वापर केल्यास कोलेस्टेरॉल वाढत नाही. (Which Two Oils Are Best For Indian Cooking And People To Reduce Risk Cholesterol)
भारतातील प्रसिद्ध न्युट्रीशनिस्ट भावेश गुप्ता यांनी भारतीयांना स्वंयपाक करण्यासाठी कोणती 2 तेलं उत्तम ठरतात याबाबत सांगितले आहे. देशातील लोकांचे राहणीमान वेगवेगळे असते. यांची काम करण्याची पद्धत, स्वंयपाक करण्याची पद्धत व्यायाम यात अंतर दिसून येतं. तुलनेने अमेरिकेचे लोक जास्त हेल्दी आहेत.
अमेरिकेत किंवा दुसऱ्या पाश्चिमात्य देशांमध्ये तळलेले पदार्थ खाण्याची परंपरा नाही. तिथे लोक सॅलेड, मीट, भाज्यांवर कमीत कमी तेल घालून खाणं पसंत करतात. विदेशांमध्ये ऑलिव्ह ऑईलचा वापर जास्त केला जातो. यात हेल्दी फॅट्स जास्त असतात. मोहोरीचे तेल आणि नारळाचं तेल स्वंयपाकासाठी उत्तम ठरते. स्मोकींग पॉईंटच्या बाबतीत मोहोरीचं तेल आणि नारळाचं तेल उत्तम ठरतं. यामुळे 200 डिग्री सेल्सियसच्या जवळपास जास्त पॉईंट असतो. हाय टेंम्परेचरवर ही तेलं जळत नाहीत.
जर तुम्ही हाय टेम्परेचरवर कुकिंगसाठी तूप वापरत असाल तर हे त्वरीत बंद करा. तुपाचा वापर करणं चुकीचं ठरतं. यातील घटक कोलेस्टेरॉलच्या गंभीर समस्यांचे कारण ठरू शकते. लोणीच्या वापराबाबत सेम गोष्ट लागू होते. ऑईल ऑक्सिडाईज असल्यामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक, कॅन्सरचा धोका वाढतो.
एसीबीआयच्या रिपोर्टनुसार ऑक्सिडाईज झाल्यामुळे कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईड, लिपिड प्रोफाईल वेगानं वाढतं. आहारतज्ज्ञ मोहरी किंवा नारळाच्या तेलात एंटी ऑक्साईड्सचा भडिमार असल्याचं सांगतात. जे हिटींग दरम्यान ऑक्सिडाईज होत नाही.
या फायद्यांव्यतिरिक्त पोषणतज्ञांनी आणखी दोन विशेष वैशिष्ट्ये सांगितली आहेत.