हिवाळ्यात महिलांना त्यांच्या शरीराची खास काळजी घेण्याची आवश्यकता असते. जास्त उष्णता आणि पोषण या काळात महिलांना हवं असते. हॉर्मोनल बदल, आयर्न कॅल्शियमची कमतरता, थकवा आणि सांधेदुखीच्या समस्यांचा महिलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. तीळ दिसायला छोटे दिसत असले तरी हिवाळ्यात तीळ खाणं कोणत्याही सुपरफूडपेक्षा कमी नाही. (Which sesame seeds are more beneficial for women)
महिलांच्या मनात असा प्रश्न असतो की काळे तीळ फायदेशीर ठरतात की पांढरे तीळ कोणते तीळ जास्त फायदेशीर ठरतात. तीळ महिलांच्या तब्येतीसाठी तसंच सुंदरतेसाठी फायदेशीर ठरतात. वय, लाईफस्टाईल, शरीराच्या गरजा यांवर तुम्ही कोणते तीळ खायचे ते अवलंबून असते. डायटिशियन श्वेता पांचाळ यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
काळे तीळ
काळ्या तिळात आयर्न, मॅग्नेशियम, जिंक आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात जे खाल्ल्यानं महिलांना बरेच फायदे मिळतात. ज्यामुळे हिमोग्लोबिन वाढतं, शरीरात एनर्जी आणि उष्णता टिकून राहते, आयर्नची कमतरता भासत नाही, थकवा येत नाही. काळे तीळ अन पॉलिश्ड असल्यामुळे यात मिनरल्स जास्त प्रमाणात असतात.
पांढरे तीळ
पांढऱ्या तिळात कॅल्शियम हेल्दी फॅट्स आणि हाडांना मजबूत करणारे मिनरल्स असतात. जे खाल्ल्यानं शरीराला बरेच फायदे मिळतात. यामुळे हाडांची मजबूत आणि बोन डेंसिटी वाढते, कॅल्शियमची कमतरता असल्यास तीळाचे सेवन उत्तम मानले जाते. तीळ हे उत्तम सुपरफूड आहे. पांढरे तीळ लाडू, चटणी, सॅलेडमध्ये वापरले जातात.
काळे की पांढरे कोणते तीळ चांगले?
काळे तीळ आयर्न, मॅग्नेशियम, एंटी ऑक्सिडेंट्सनी परीपूर्ण असतात. ज्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते एनर्जी लेव्हल टिकून राहते कॅल्शियमच्या कमतरतेमुळे तुमची हाडं कमकुवत होत असतील तर पांढरे तीळ उत्तम ठरतात. पांढरे तीळ कॅल्शियम आणि हेल्दी फॅट्सचा चांगला स्त्रोत आहेत. ज्यामुळे हाडं मजबूत राहतात सांधेदुखीची समस्या उद्भवत नाही. दोन्ही प्रकारच्या तिळांचा आहारात समावेश केल्यास उत्तम ठरते.
