'व्हिटामिन B - १२' हे आपल्या शरीरासाठी एक अत्यंत महत्त्वाचे पोषक तत्व आहे. 'व्हिटामिन B - १२' हे मज्जासंस्था आणि रक्ताच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असते. या महत्वाच्या पोषक तत्वांमुळे मज्जासंस्था नीट कार्य करते, रक्तपेशींचं उत्पादन होतं आणि शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. B - १२ हे प्रामुख्याने नॉनव्हेज (Which pulses/dal is rich in Vitamin B12) पदार्थांमधून मिळते, त्यामुळे शक्यतो शाकाहारी असणाऱ्यांच्या शरीरात 'व्हिटामिन'B - १२' ची कमतरता फार मोठ्या प्रमाणात असते. शाकाहारी लोकांसाठी व्हिटामिन B - १२' चे नैसर्गिक स्रोत कमी असल्यामुळे, या व्हिटामिनची (dals with vitamin B12 content) कमतरता अनेकदा दिसून येते. शाकाहारी असणाऱ्यांमधील B - १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी हा एक नैसर्गिक आणि उत्तम स्रोत आहे. काही विशिष्ट डाळींचा रोजच्या आहारात समावेश केल्यास ही कमतरता काही प्रमाणात भरून काढता येऊ शकते. आपल्या रोजच्या आहारात वापरल्या जाणाऱ्या एका विशिष्ट डाळीमध्ये व्हिटामिन 'B - १२' नैसर्गिकरित्या आढळते(natural sources of vitamin B12 in dal).
आपण व्हिटामिन 'B - १२' ने समृद्ध असलेल्या अशा डाळीबद्दल जाणून घेणार आहोत, जी शाकाहारी लोकांसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. या खास डाळीचा रोजच्या आहारात समावेश केल्यास, व्हिटामिन B - १२' ची कमतरता काही प्रमाणात दूर करू शकता. व्हिटामिन 'B - १२' ची कमतरता भरुन काढणारी ही खास डाळ नेमकी कोणती आहे ते पाहूयात...
व्हिटामिन 'B - १२' ची कमतरता कोणत्या डाळीमुळे भरुन काढता येते ?
व्हिटामिन 'B - १२' फक्त नॉनव्हेज पदार्थांमधून मिळते. परंतु, शाकाहारी लोकांसाठी मूग डाळ हा एक उत्तम पर्याय असू शकतो. मूग डाळ खूप पौष्टिक असते आणि पचायलाही हलकी असते. यामध्ये प्रोटीन, फायबर, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फोलेट यांसारखी पोषक तत्वे भरपूर प्रमाणात आढळतात.
गुडघेदुखीवर असरदार वडाच्या पानांचा आयुर्वेदिक उपाय! वेदना आणि सूज होते कमी-पाहा करायचे काय
मूग डाळ व्हिटॅमिन बी१२ ची कमतरता कशी भरून काढू शकते?
१. फोलेट (व्हिटामिन बी९) :- मूग डाळीमध्ये असलेले फोलेट (व्हिटामिन बी९) लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करते. त्यामुळे व्हिटामिन बी १२ च्या कमतरतेमुळे होणाऱ्या ॲनिमियासारख्या आजाराला प्रतिबंध होतो. याशिवाय, फोलेट लाल रक्तपेशी निरोगी ठेवते आणि बी१२ च्या कमतरतेमुळे येणाऱ्या अशक्तपणालाही दूर करते.
२. पचनसंस्थेला मदत :- मूग डाळ पचायला हलकी असल्यामुळे पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर असते. व्हिटामिन 'B - १२' च्या योग्य शोषणासाठी निरोगी पचनसंस्था असणे आवश्यक असते. मूग डाळ सहज पचते, ज्यामुळे शरीर व्हिटामिन 'B - १२' चे उत्तम प्रकारे शोषण करू शकते.
३. प्रोटीन आणि लोहायुक्त :- मूग डाळीतील प्रोटीन शरीरातील पेशींच्या दुरुस्तीसाठी आणि वाढीसाठी मदत करते, ज्यामुळे बी१२ च्या कमतरतेमुळे होणारा परिणाम कमी होतो. या डाळीमध्ये लोहाचे प्रमाणही चांगले असते, जे ॲनिमिया आणि थकवा दूर करण्यासाठी प्रभावी आहे.
डाएटिशियन ऋजुता दिवेकर सांगतात ५ पावरफुल फूड कॉम्बिनेशन! वजन होईल कमी - रहाल कायम फिट...
आहारात मूग डाळीचा समावेश कसा करावा?
१. मूग डाळीची खिचडी बनवून खाऊ शकता किंवा सूप पिऊ शकता.
२. नेहमीच्या जेवणात मुगाची डाळ, भात किंवा पोळी/पराठ्यासोबत खाऊ शकता.
३. मूग डाळीच्या पिठापासून घावन (चीला) किंवा डोसा बनवूनही खाऊ शकता.
४. जर तुम्हाला गोड आवडत असेल तर मूग डाळीचा हलवा एक उत्तम पर्याय आहे.