Water Drinking Tips : शरीरातील पाण्याची कमतरता आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना आमंत्रण देऊ शकते. म्हणूनच हेल्थ एक्स्पर्ट्स नेहमी शरीर हायड्रेटेड ठेवण्याचा सल्ला देतात. पाणी कमी झाल्यास शरीरातील काही अवयवांमध्ये वेदना देखील जाणवतात. निरोगी राहण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणं अत्यंत महत्त्वाचं आहे, अन्यथा आरोग्य बिघडू शकतं.
पोटदुखी
जे लोक दिवसभर पुरेसं पाणी पित नाहीत, त्यांना पोटात वेदना जाणवू शकतात. शरीरातील पाण्याची कमतरता किडनी स्टोनचा धोका वाढवते. स्टोनमुळे होणारी पोटदुखी खूप तीव्र असते. तसेच, शरीरात पाणी कमी असल्यास डोकेदुखीही वारंवार जाणवू शकते.
सांधेदुखी आणि स्नायूदुखी
सांध्यांमध्ये जाणवणारा त्रासही पाण्याच्या कमतरतेमुळे होऊ शकतो. हेल्थ एक्स्पर्ट्सच्या मतानुसार, पाणी कमी झाल्यास हाडे आणि स्नायूंचे आरोग्य बाधित होतं. योग्य प्रमाणात पाणी न प्यायल्यास जॉइंट पेनसोबत मसल पेनची समस्या देखील उद्भवू शकते.
हायड्रेशनसाठी पाण्यासोबत खालील पेयांचा वापर करू शकता:
नारळपाणी
फळांचे रस
लस्सी
लिंबूपाणी
दररोज किती पाणी प्यावं?
दिवसाला किमान 2 ते 3 लिटर पाणी प्यायची शिफारस केली जाते. 3 लिटर म्हणजे अंदाजे 12 ग्लास पाणी. बाहेर फील्डमध्ये काम करणाऱ्या लोकांना यापेक्षा जास्त पाणी पिण्याची गरज असते.
पचन सुधारण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, ऊर्जा मिळवण्यासाठी आणि किडनी-लिव्हर डिटॉक्ससाठी पाणी पिणं अत्यंत फायदेशीर आहे.
