सणासुदीला आणि विशेषतः श्रावणातील प्रत्येक सणांदरम्यान आपण सगळेच आनंदाने आणि उत्साहाने खाण्यापिण्याचा आनंद घेतो. सणासुदीच्या दिवसांत गोडधोड, तेलकट आणि तूपकट असे पदार्थ फार मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात. या खास सणासुदी दरम्यान आपल्याकडे केल्या जाणाऱ्या खास पारंपरिक पदार्थांमध्ये तेलाचा वापर हा सर्वात जास्त प्रमाणांत केला जातो. पण अशा पदार्थांचा आस्वाद घेताना आरोग्याची काळजी घेणे देखील तितकेच(Which Oils Are Best For Health & Which Oil Is Worst Explained By The Doctor ) महत्त्वाचे असते. चुकीच्या तेलात तळलेले पदार्थ पचनावर ताण (best oils for health) आणू शकतात आणि कोलेस्ट्रॉलसारख्या समस्या निर्माण करू शकतात. यासाठीच, सणावाराचे (healthiest cooking oils) पदार्थ चविष्ट तर असावेतच, पण त्याचबरोबर ते योग्य आणि हेल्दी तेलात तळले गेले तर आरोग्याला हानी न पोहोचवता आनंदाने पोटभर खाता येतात(healthy oils for cooking).
अनेकदा आपण चवीला महत्त्व देतो, पण आरोग्य आणि तेलकट पदार्थ यांच्याकडे दुर्लक्ष करतो. आरोग्याची काळजी घेताना आपल्या स्वयंपाकातील तेलाची निवड ही एक महत्त्वाची गोष्ट असते. बाजारात विविध प्रकारची तेलं उपलब्ध असतात, यात शेंगदाणा, सूर्यफूल, मोहरीचे तेल, राइस ब्रान ऑइल. पण यापैकी कोणतं तेल तळण्यासाठी योग्य आहे, ज्यामुळे पदार्थांची चवही टिकेल आणि आरोग्यालाही हानी पोहोचणार नाही असा प्रश्न आपल्याला पडतो. डॉ. सुरेंद्र कुमार यांनी सणावारा दरम्यान जर तेलकट पदार्थ खायचे असल्यास कोणत्या हेल्दी तेलाचा वापर करावा, याबद्दल अधिक माहिती नवभारत टाइम्सला दिली आहे. यासाठीच, यंदाच्या सणावारा दरम्यान कोणती तेलं खरंच हेल्दी मानली जातात आणि सणावाराचे पदार्थ तळण्यासाठी योग्य ठरतात ते पाहूयात...
रिफाइंड तेल का टाळावे ?
रिफाइनिंग दरम्यान तेलातील ऑक्सिडाइज फॅट्स तयार होतात, जे शरीरातील फ्री रॅडिकल्स वाढवून पेशींना नुकसान पोहोचवतात. हे फॅट्स शरीरात इन्फ्लेमेशन वाढवतात, ज्यामुळे पचनासंबंधी त्रास, हार्मोनल इम्बॅलन्स आणि इतर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. जास्त तापमानावर गरम केल्यास रिफाइंड तेलातून टॉक्सिक कंपाऊंड्स बाहेर पडतात, जे दीर्घकाळात हृदयविकार, मधुमेह आणि कॅन्सरचा धोका वाढवतात. यासाठीच रोजच्या आहारात आणि विशेषतः सणावाराचे तळणाचे पदार्थ करताना रिफाइंड तेल टाळणे हेच जास्त सुरक्षित ठरते. त्याऐवजी पारंपरिक आणि नैसर्गिक पद्धतीने मिळणारी कोल्ड-प्रेस्ड तेलं किंवा घरगुती वापरली जाणारी सेंद्रीय तेलं अधिक फायदेशीर असतात. जास्त प्रमाणात रिफाइंड तेलाचा वापर केल्याने हृदयरोग, मधुमेह यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. याचा जास्त वापर केल्यास शरीराचा मेटाबॉलिझम मंदावतो, ज्यामुळे अन्न नीट पचत नाही आणि वजन झपाट्याने वाढू लागते.
वात-पित्त-कफ प्रकृतीनुसार कोणते डिटॉक्स ड्रिंक प्यावे? कुणासाठी काय चांगलं, कशानं वाटेल फ्रेश....
मग नेमकं कोणत्या तेलाचा वापर करावा ?
१. खोबरेल तेल :- जर सणवार, उत्सवादरम्यान जास्त तळलेले पदार्थ तयार करायचे असल्यास, आपण खोबरेल तेलाची निवड करू शकता. यात फायदेशीर सॅचुरेटेड फॅट्स असतात, जे शरीरासाठी हानिकारक नसतात. संशोधनानुसार, खोबरेल तेलाचा स्मोक पॉइंट (ज्या तापमानावर तेल जळायला लागते) अंदाजे ३५० ते ४०० डिग्री फॅरनहाइट असतो. त्यामुळे, जास्त गरम केल्यावरही हे तेल खराब होत नाही. यात शरीरासाठी उपयुक्त असे फॅटी ॲसिड सुद्धा असतात, जे त्वचेची सूज कमी करण्यास मदत करतात.
२. ऑलिव्ह ऑइल :- डॉ. सुरेंद्र कुमार यांच्या मते, ऑलिव्ह ऑइलमध्ये मोनो-अनसॅचुरेटेड फॅट भरपूर प्रमाणात असते, जे हृदयाच्या आरोग्याची आणि संपूर्ण शरीराची काळजी घेते. स्मोक पॉइंटबद्दल बोलायचं झाल्यास, ऑलिव्ह ऑइलचा स्मोक पॉइंट साधारणपणे ४५० ते ४६० अंश फॅरनहाइट असतो. शरीरातील सूज कमी करण्यासाठी ऑलिव्ह ऑइलमध्ये ओलेओकॅंथल नावाचं नैसर्गिक संयुग आढळतं. तज्ज्ञांनुसार, जर तुम्ही साधं ऑलिव्ह ऑइल वापरत असाल, तर तुम्ही त्यात डीप फ्राय करू शकता. पण एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल डीप फ्रायसाठी वापरणं टाळावं, कारण ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.
वाट्टेल ते झालं तरी करा रोज सकाळी ३ गोष्टी, वजन होईल झरझर कमी- वेटलॉसचा नवा सोपा उपाय....
३. एव्होकॅडो तेल :- एव्होकॅडो तेलाचा स्मोक पॉइंट ५०० अंश फॅरनहाइट असतो. त्यामुळे डीप फ्राय करण्यासाठी हा एक चांगला पर्याय मानला जातो. आरोग्याच्या दृष्टीने हे तेल खूप हलके आणि आरोग्यदायी असते.
४. साजूक तूप :- पोषणतज्ज्ञांच्या मते, शतकानुशतके साजूक तूप खाण्यासाठी वापरले जाते. तूप सांधेदुखी आणि पचनासाठी खूप फायदेशीर असते. जर डीप फ्रायबद्दल बोलायचं झाल्यास, तुपाचा स्मोकिंग पॉइंट ४० अंश फॅरनहाइट इतका असतो. त्यामुळे, आपण साजूक तुपात डीप फ्राय सहज करू शकता. तुपामध्ये हेल्दी फॅट्स असतात. साजूक तुपातील काही आवश्यक घटक पोटाच्या कार्याला योग्य प्रकारे चालण्यासाठी देखील मदत करते.