Join us
Daily Top 2 Weekly Top 5

रोजच्या स्वंयपाकासाठी कोणतं तेल चांगलं? डॉक्टर सांगतात 'हे' तेल घ्या, हृदय निरोगी राहील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 17:49 IST

Which Oil IS Best For Cooking :

स्वंयपाकघरात रोज वापरला जाणारा पदार्थ म्हणजे तेल. हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तुम्ही कोणतं तेल वापरता,  किती प्रमाणात वापरता हे खूपच महत्वाचे असते. याबाबत फरिदाबाद येथिल डॉ. गजिंदर गोयल सांगतात की तेलाचा वापर नेहमी कमी प्रमाणातच करावा. (Which Oil IS Best For Cooking) तेल कमी प्रमाणात वापरल्यास त्यामुळे कोणतंही नुकसान होत नाही.

डॉ. गोयल यांच्यामते एका हेल्दी व्यक्तीनं  रोज  3 ते 4 चमचे म्हणजे  15 ते 20 मिलीलीटर तेल खायला हवं. म्हणजेच एका महिन्यात 500  ते 600 मिलीलीटर तेल पुरेसं आह 4 लोकांचे कुटूंब असेल तर 2 लीटरपेक्षा जास्त तेलाचा वापर करू नका. (Best Cooking Oil For daily Use)

हृदयाच्या आरोग्यासाठी कोणतं तेल चांगलं?

मोहोरीचं तेल, सोया, ऑलिव्ह ऑईल, नारळाचं तेल याव्यतिरिक्त इतर तेलही  बाजारात मिळतात. पण कोणतं तेल हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं ठरतं असा प्रश्न अनेकांना पडतो. हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी कच्च्या लाकडी घाणीचे मोहोरीचे तेल उत्तम मानले जाते. कारण याचा स्मोक पॉईंट जवळपास २५० डिग्री सेल्सियस असतो. यामुळे हे तेल लवकर जळत  नाही आणि पोषक तत्वही सुरक्षित राहतात. हृदयासाठी सुर्यफुलाचे तेलही उत्तम ठरते.  ऑलिव्ह ऑइलसुद्धा भारतीय अन्न शिजवण्याासठी उत्तम ठरते. कारण याचा  स्मोक पॉईंट कमी असतो.

 रिफाईंड तेल वापरणं टाळा

स्वयंपाकात रिफाईंड तेलाचा वापर करणं टाळा. हे तेल जास्त तापमान आणि केमिकल प्रोसेसिंगमधून जातं. ज्यामुळे यात टॉक्सिन्स तयार होतात. दीर्घकाळ याचे सेवन केल्यास  कोलेस्टेरॉल वाढू शकतं. कधीतरी तळलेले अन्नपदार्थ खाल्ल्यानं तब्येतीला धोका पोहोचत नाही. पण तुम्ही रोज डीप फ्राय फूड खात असाल तर ही सवय धोकादायक ठरू शकते. ज्यामुळे नसांमध्ये चरबी जमा होते. क्रॉनिक सूज, लठ्ठपणा, डायबिटीज हार्ट अटॅक आणि स्ट्रॉक जोखिमेचा धोका दुप्पट वाढतो.

तेलाचे प्रमाण किती सुरक्षित ठेवावं?

रोज १५ ते २० मिली तेलाचे सेवन करा. आठवड्यातून १०५ ते १४० मिली तेल वापरा. महिन्यातून ५०० ते ६०० मिली म्हणजेच अर्धा लिटर तेलाचा वापर करा.

हृदयाच्या रुग्णांसाठी नियम

जर कोणतीही व्यक्ती हृदयाच्या समस्यांनी ग्रासलेली असेल तर तेलाचं प्रमाण कमी असायला हवं. डॉ. गोयल सांगतात की हार्ट पेशंट्सी  महिन्यातून  ७५० मिलीलीटरपेक्षा जास्त तेलाचे सेवन करू नये. चव आणि पोषणच्या संतुलनासाठी  मोहोरीचे तेल आणि २० टक्के तूप किंवा लोण्याचं मिश्रण खाण्याचा सल्ला दिला जातो.

English
हिंदी सारांश
Web Title : Best cooking oil for daily use: Doctor's recommendations for heart health.

Web Summary : Choosing the right cooking oil is crucial for heart health. Dr. Goel advises limiting oil intake to 3-4 teaspoons daily. Mustard and sunflower oil are good choices. Avoid refined oils due to harmful processing. Heart patients should consume less oil.
टॅग्स : कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.हेल्थ टिप्स