Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > शेंगदाणा, मोहरी, सनफ्लॉवर की खोबरेल तेल? रोजच्या स्वयंपाकासाठी कोणतं तेल चांगलं? वाचा खास टिप्स 

शेंगदाणा, मोहरी, सनफ्लॉवर की खोबरेल तेल? रोजच्या स्वयंपाकासाठी कोणतं तेल चांगलं? वाचा खास टिप्स 

Which Oil Is Best For Daily Cooking?: रोजच्या स्वयंपाकासाठी कोणतं तेल वापरणं जास्त चांगलं असतं, असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर तज्ज्ञांनी दिलेली ही विशेष माहिती वाचाच..(how to choose perfect cooking oil according to our health?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2025 14:43 IST2025-08-12T14:42:47+5:302025-08-12T14:43:42+5:30

Which Oil Is Best For Daily Cooking?: रोजच्या स्वयंपाकासाठी कोणतं तेल वापरणं जास्त चांगलं असतं, असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर तज्ज्ञांनी दिलेली ही विशेष माहिती वाचाच..(how to choose perfect cooking oil according to our health?)

which oil is best for daily cooking, Which oil is truly right for your body and climate?, how to choose perfect cooking oil according to our health | शेंगदाणा, मोहरी, सनफ्लॉवर की खोबरेल तेल? रोजच्या स्वयंपाकासाठी कोणतं तेल चांगलं? वाचा खास टिप्स 

शेंगदाणा, मोहरी, सनफ्लॉवर की खोबरेल तेल? रोजच्या स्वयंपाकासाठी कोणतं तेल चांगलं? वाचा खास टिप्स 

Highlightsतज्ज्ञांनी दिलेली ही खास उत्तरं पाहा आणि तुमचं तुम्हीच ठरवा की तुमच्या तब्येतीनुसार तुमच्यासाठी कोणतं तेल खाणं जास्त फायदेशीर ठरू शकतं.

आपल्या आहारातलं तेलाचं प्रमाण हा आता जवळपास सगळ्याच वयोगटातल्या लोकांसाठी एक अतिशय महत्त्वाचा विषय झाला आहे. कारण त्या तेलावरच तुमची तब्येत बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते. त्यामुळेच आपण रोजच्या स्वयंपाकासाठी कोणतं तेल खावं, ते तेल खाण्याचे फायदे- तोटे कोणते, तेल किती प्रमाणात खावं, असे कित्येक प्रश्न सर्वसामान्यांना नेहमीच पडतात (which oil is best for daily cooking?). त्याच प्रश्नांची तज्ज्ञांनी दिलेली ही खास उत्तरं पाहा आणि तुमचं तुम्हीच ठरवा की तुमच्या तब्येतीनुसार तुमच्यासाठी कोणतं तेल खाणं जास्त फायदेशीर ठरू शकतं.(how to choose perfect cooking oil according to our health?)

रोजच्या स्वयंपाकासाठी कोणतं तेल जास्त चांगलं?

 

रोजच्या स्वयंपाकासाठी कोणतं तेल वापरावं हे कसं ओळखावं, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ डॉक्टरांनी drtanvi_ayurved_and_more या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये प्रत्येक तेलानुसार त्यांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे..

फॅटी लिव्हरचा त्रास? ५ पदार्थ खा- विषारी पदार्थ बाहेर पडून शरीर हाेईल डिटॉक्स, दुखणं थांबेल

१. शेंगदाणा तेल
शेंगदाण्याचं तेल हे वातशामक असतं. सांधेदुखी कमी करण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी तसेच त्वचेसाठी हे तेल चांगले असते. या तेलाचा स्मोकिंग पॉईंट जास्त आहे. त्यामुळे फोडणी देऊन केल्या जाणाऱ्या पदार्थांसाठी तसेच डिप फ्राय करण्यासाठी हे तेल वापरणं जास्त चांगलं. या तेलामध्ये गुड फॅट्स असतात. त्यामुळे ते जर योग्य प्रमाणात खाल्लं तर त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढत नाही. रोजच्या वापरासाठी डॉक्टरांनी हे तेल उत्तम असल्याचं सांगितलं आहे.

 

२. खोबरेल तेल

हे तेल थंड आणि पित्तशामक असतं. या तेलाचा स्मोकिंग पॉईंट कमी असतो. त्यामुळे तळण्यासाठी किंवा फोडणीसाठी ते वापरू नये.

भन्नाट देसी जुगाड! एक्सपायरी झालेल्या गोळ्यांनी धुवा पांढरे कपडे, पिवळेपणा जाऊन कपडे शुभ्र चमकतील.. 

सॉटिंगसाठी ते वापरू शकता. शिवाय या तेलामध्ये बॅड फॅट्स असतात. त्यामुळे जर तुम्ही ते जास्त प्रमाणात खात असाल तर त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढू शकतं.

 

३. सनफ्लॉवर ऑईल
 
सुर्यफुलाचं तेल हे वात वाढविणारं आणि रुक्ष मानलं जातं. हे तेल खूप जास्त प्रोसेस्ड असतं. त्यामुळे इतर तेलांच्या तुलनेत त्यातले पौष्टिक घटक कमी झालेले असतात.

५ पदार्थ रोज खा- त्वचेचं तारुण्य, सौंदर्य नेहमी वाढतच जाईल! फेशियल, क्लिनअपची गरजच नाही..

त्यामुळे हे तेल रोजच्या स्वयंपाकासाठी वापरू नका. कधीतरी तळण्यासाठी हे तेल वापरलं तर चालते कारण त्याचा स्मोकिंग पॉईंट जास्त असतो. ओमेगा ६ फॅटी ॲसिड जास्त असतं. त्यामुळे ते जास्त प्रमाणात खाल्लं तर डायबिटीज, ट्रायग्लिसराईड, फुफ्फुसांचे आजार वाढू शकतात.

४. मोहरीचं तेल

मोहरीचं तेल उष्ण आणि कफ कमी करणारं असतं. या तेलामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि कोलेस्टेरॉल वाढत नाही. हिवाळ्यात हे तेल खाणे उत्तम आहे. 

 

Web Title: which oil is best for daily cooking, Which oil is truly right for your body and climate?, how to choose perfect cooking oil according to our health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.