भारतातल्या बहुसंख्य लोकांचा प्रमुख आहार म्हणजे भाजी, वरण, भात आणि पोळ्या. गव्हाच्या पोळ्यांऐवजी बाजरीची, ज्वारीची भाकरी, नाचणीची भाकरी, तांदळाच्या पोळ्या असेही प्रकार काही घरांमध्ये केले जातात. पण बहुतांश लोक मात्र सकाळ- संध्याकाळ गव्हाच्या पोळ्याच खातात. एवढ्या जास्त प्रमाणात गव्हाच्या पोळ्या किंवा चपात्या खाणं आरोग्यासाठी आजिबातच चांगलं नाही (side effects of eating wheat roti). त्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह, बीपी अशा अनेक आजारांना आपण निमंत्रण देत आहोत, असं तज्ज्ञ सांगत आहेत..(Which is the best alternate option for wheat roti?)
गव्हाची पोळी जास्त प्रमाणात खाणं का टाळावं?
याविषयी तज्ज्ञ सांगतात की गव्हाच्या पोळ्या पौष्टिकच असतात. पण अगदी रोजच तुम्ही सकाळ- संध्याकाळ गव्हाच्या पोळ्याच खात असाल तर ते मात्र तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.
शिट्टी होताच कुकरमधलं पाणी फसफसून बाहेर येतं? १ वाटी घेऊन करा 'हा' भन्नाट उपाय...
कारण त्यामध्ये ग्लुटेन असतं आणि त्यामुळे अनेकांच्या अपचनाच्या, लठ्ठपणाच्या, मधुमेहाच्या समस्या वाढतात. गव्हाच्या पोळ्या सतत खाल्ल्यामुळे पित्त येणे, ढेकर येणे, गॅसेस होणे, पोट गच्च होणे असेही त्रास होतात. गव्हाच्या पोळीमध्ये कार्ब्स आणि कॅलरी यांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रात्रीच्या वेळी गव्हाची पोळी खाल्ल्यास ती पचायला जास्त वेळ लागतो आणि मधुमेहींच्या बाबतीत तर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याचाही धोका असतो. त्यामुळे गव्हाच्या पोळीचा अतिरेक टाळून त्याला तुम्ही एखादा दुसरा पर्यायही शोधायला हवा, असं तज्ज्ञ सांगतात.
मी कधीच सांगत नाही की भाज्या खाऊ नका… भरपूर खा. पालेभाज्या, फळभाज्या.. सगळं.! फक्त एक करायचंय की त्यासोबत “पोळी” नाही खायची. इतकंच. वाटल्यास थोडासा नैवेद्य एवढा भात खा. पण ते गहू नको. काहीही करा पण गहू बंद करा. तेव्हाच हा पित्ताचा त्रास, ढेकर येणं, गॅसेस होणं, पोट गच्च वाटणं ई… pic.twitter.com/erVa3jmyzr
— Dr. Mrudul Deshpande (@Dr_of_Lifestyle) January 4, 2024
गव्हाच्या पोळीसाठी काय पर्याय निवडावा?
सतत गव्हाची पोळी खाण्यापेक्षा दिवसातून एकदा तरी मल्टीग्रेन पोळ्या खायला प्राधान्य द्यावे असं तज्ज्ञ सांगतात.
बोटामध्ये काटा घुसल्यास पिन, सुई वापरू नका, 'हा' उपाय करा- काटा आपोआप बाहेर येईल
मल्टीग्रेन रोटीसाठी पीठ तयार करताना त्यात गहू, मका, ज्वारी, नाचणी, बाजरी, हरबरे, मुगाची डाळ, उडदाची डाळ असे सगळेच समप्रमाणात घालावे आणि त्याचे पीठ तयार करून त्याच्या पोळ्या खाव्या. या पोळ्यांमध्ये फायबर तसेच इतरही अनेक पौष्टिक घटक असतात. शिवाय गव्हाच्या पोळीच्या तुलनेत या मल्टीग्रेन चपात्या पचायला हलक्या असतात.