चुकीचा आहार, जास्त तेल आणि कमी फिजिकल एक्टिव्हिटीजमुळे शरीरात बॅड कोलेस्टेरॉल वाढू लागते. कोलेस्टेरॉल हा एक चिकट पदार्थ आहे जो लिव्हरमधून निघतो. हे कोलेस्टेरॉल नसांच्या भितींवर जमा होऊ लागतं. ज्यामुळे नसा ब्लॉक होऊन ब्लड सर्क्युलेशन प्रभावित करतात. (Which Is Best Cooking Oil)
आपण रोज जे काही पदार्थ खातो त्यातून शरीराला २ प्रकारे कोलेस्टेरॉल मिळते. एक गुड कोलेस्टेरॉल आणि बॅड कोलेस्टेरॉल तसंच सॅच्युरेडेट फॅट्सचे प्रमाण वाढते. म्हणून हाय कोलेस्टेरॉल असलेल्या रुग्णांनी तेलाचा वापर विचार करून करायला हवा. (Which Is Best Cooking Oil For Cholesterol You Should Consume to lower Cholesterol)
कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी कोणतं तेल खावं?
तेलात जे फॅट्स असतात ते गुड फॅ्टस असतात. खासकरून मोहोरीचे तेल आणि राईस ब्रान ऑईल दोन्ही स्वंयपाकासाठी उत्तम मानले जातात. कोलेस्टेरॉलच्या रुग्णांसाठी एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑईल उत्तम मानले जाते. यात काही खास पोषक तत्व असतात ज्यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहतं. सॅलेड किंवा अन्नाच्या ड्रेसिंगसाठी ऑलिव्ह ऑईल उत्तम पर्याय आहे. या तेलाचा वापर तुम्ही कुकींगसाठीही करू शकता. ज्यांना कमीत कमी फॅट्स हवे आहेत ते ऑलिव्ह ऑईल वापरू शकतात.
कोलेस्टेरॉलसाठी उत्तम ठरतं अळशीचं तेल
अळशीच्या तेलात ओमेगा-३, ओमेगा-६ आणि ओमेगा-९ असते. तसंत यात पॉली अनसॅच्युरेडेट फॅट्स असतात जे हार्ट हेल्थसाठी फायदेशीर ठरतात. कोलेस्टेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ते अमृतासमान ठरतात. ज्या लोकांना कोलेस्टेरॉल वाढण्याची समस्या आहे त्यांनी दिवसभरात ३० ते ४० ग्रॅम अळशीचे सेवन करायला हवे. तुम्ही अळशी फक्त तेलाच्या स्वरूपात नाही तर वेगवेगळ्या प्रकारे आहारात वापरू शकता.
शेंगदाण्याचे तेल
मेडीकल न्युज टु डे च्या रिपोर्टनुसार हाय कोलेस्टेरॉलची समस्या असलेल्यांनी शेंगदाण्याच्या तेलाचा आहारात समावेश करायला हवा. यात मोनोअनसॅच्युरेडेट फॅट्स असतात जे बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात. शेंगदाण्याच्या तेलात पॉलिअनसॅच्युडेटे फॅट्स असतात ते हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. शेंगदाण्याचं तेल आहारात वापरल्यानं गुड कोलेस्टेरॉल वाढण्यास मदत होते. (Ref)
तिळाचं तेल
हेल्थ एक्सपर्ट्स तिळाचं तेल गुणकारी असल्याचं सांगतात. अनेक वर्षांपासून स्वयंपाकासाठी तिळाचं तेल वापरलं जात आहे. तिळाचं तेल कोलेस्टेरॉल फ्री असून गरम असते. भाजी करण्यासाठी तुम्ही तिळाच्या तेलाचा वापर करू शकता. जवळपास १ चमचा तिळाच्या तेलात ५ ग्रॅम मोनोअनसॅच्युरेडेट फॅट, २ ग्रॅम सॅच्युरेटेड फॅट आणि गुड फॅट्स असतात.
