Join us

लिव्हरचे आजार होणार नाहीत, फक्त रोज प्या 'हे' खास नॅचरल ड्रिंक! तब्येत कायम ठणठणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 19:50 IST

Liver Detox Drink :लिव्हरची काम वेगवेगळी असतात, त्यातील एक महत्वाचं काम म्हणजे शरीरातील विषारी तत्व बाहेर काढणं.

Liver Detox Drink : आजकालच्या बदलत्या लाइफस्टाईलमुळे वेगवेगळे नवीन आजार समोर येत आहेत. यातीलच एक वेगानं वाढत असलेली समस्या म्हणजे फॅटी लिव्हर. लिव्हरवर सूज किंवा फॅट जमा झाल्यानं फॅटी लिव्हरची समस्या होते. ज्यानंतर शरीरात इतरही अनेक समस्या घर करतात. लिव्हरची काम वेगवेगळी असतात, त्यातील एक महत्वाचं काम म्हणजे शरीरातील विषारी तत्व बाहेर काढणं.

जर लिव्हर योग्यपणे हे काम करत नसेल तर त्यासाठी लिव्हर साफ करण्याची गरज पडते. अशात लिव्हर साफ करण्यासाठी एक खास ड्रिंक आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आयुर्वेदिक एक्सपर्ट डॉ. रॉबिन शर्मा यांनी एक कमी खर्चाचा सोपा उपाय सांगितला आहे. ज्याद्वारे शरीराची आतून सफाई करता येईल.

डॉ. रोबिन शर्मा सांगितलं की, केवळ २ रूपये खर्च करून तुम्ही लिव्हर-किडनी किंवा पूर्ण शरीर डिटॉक्स करू शकता. एका खास डिटॉक्स ड्रिंकचं सेवन करून तुम्ही ३० दिवसात वेगवेगळ्या समस्या कमी करू शकता. चला जाणून घेऊ काय आहे हे डिटॉक्स ड्रिंक आणि कसं करावा त्याचा वापर.

लिव्हर-किडनी होईल डिटॉक्स

डॉ. रॉबिन शर्मा यांनी किडनी आणि लिव्हर डिटॉक्स करण्याची पद्धत सांगितली आहे. जेव्हा किडनी आणि लिव्हर टॉक्सिनच्या संपर्कात येते तेव्हा दोन्ही अवयव त्यांची कामे व्यवस्थित करत नाहीत. ज्यामुळे सूज येऊ शकते आणि हळूहळू हे अवयव डॅमेज होऊ शकतात.

कोणत्या समस्या होतील दूर?

या डिटॉक्स ड्रिंकने लिव्हर टॉक्सिनची समस्या, किडनीतील विषारी पदार्थाची समस्या, बॉडी डिटॉक्स, अ‍ॅसिडिटी, यूरिन ट्रॅक्ट इन्फेक्शन, किडनी स्टोन, पीसीओडी किंवा पीसीओएस, वाढलेलं वजन, हाय ब्लड शुगर अशा समस्या दूर करण्यास मदत मिळू शकते.

कसं तयार कराल जवाचं ड्रिंक?

जव या धान्यातून आपल्या शरीराला अनेक पोषक तत्वे मिळतात. त्यासोबतच जवाच्या मदतीने अनेक रोगांपासूनही बचाव केला जाऊ शकतो. जव ही गव्हाचीच एक प्रजाती आहे. पण जव गव्हाच्या तुलनेत हलकं आणि जाड धान्य आहे. जवामध्ये मुख्यत्वे लेक्टिक अ‍ॅसिड, सॅलिसिलीक अ‍ॅसिड, फॉस्फोरिक अ‍ॅसिड, पोटॅशिअम आणि कॅल्शिअम उपलब्ध असतात. 

मुठभर जव २ ग्लास पाण्यात उकडा. जेव्हा पाणी एक ग्लास शिल्लक राहील तेव्हा गॅस बंद करा. नंतर हे गाळून घ्या. हे पाणी अर्धा ते एक तासात एक एक घोट करत सेवन करा.लागोपाठ ३० दिवस याचं सेवन केल्याने वेगवेगळ्या समस्या दूर होतील.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य