Drinking water in a copper vessel: तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी पिण्याची परंपरा भारतात फार पूर्वीपासून आहे. आयुर्वेदच काय तर विज्ञान देखील याला हेल्दी मानतं. कारण तांब्यामध्ये अॅंटी बॅक्टेरिअल, अॅंटी ऑक्सीडेंट आणि अॅंटी-इंफ्लामेटरी गुण असतात. जे आरोग्यासाठी खूप चांगले असतात. इतकंच नाही तर काही आजारांमध्ये देखील या भांड्यातील पाणी पिणं गुणकारी ठरू शकतं. अशात तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने काय फायदे होतात आणि कुणासाठी हे पाणी नुकसानकारक ठरू शकतं हे सुद्धा माहीत असायला हवं. तेच आज आपण पाहणार आहोत.
तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे
१) तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे सांगितले जातात. याने शरीरातील तांब्याची कमतरता पूर्ण होते. तसेच रोग पसरवणाऱ्या बॅक्टेरियांपासूनही शरीर सुरक्षित राहतं.
२) तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी अधिक शुद्ध मानलं जातं. हे पाणी जुलाब, काविळ, अतिसार यांसारखे अनेक आजार पसरवणाऱ्या बॅक्टेरियांना नष्ट करतं.
३) तांब्यात अँटी-इन्फ्लामेटरी गुण असतात. ज्यामुळे शरीराला वेदना, वात आणि सूज येत नाही. संधिवात असल्यास तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायल्याने फायदा होऊ शकतो.
४) अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार, कॅन्सरची सुरुवात रोखण्यास तांबे फायदेशीर आहे. यामध्ये कॅन्सरविरोधी घटक असतात. त्यामुळे नियमितपणे तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
५) पोटाचे वेगवेगळे आजार पळवून लावण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी फायदेशीर मानलं जातं. दररोज हे पाणी प्यायल्यास पोटदुखी, गॅस, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या दूर होऊ शकतात.
६) तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी प्यायल्यानं त्वचेच्याही काही समस्या दूर होण्यास मदत मिळते. या पाण्यामुळे पिंपल्स तसेच त्वचेसंदर्भातील रोग होत नाहीत. तसंच त्वचा साफ आणि अधिक चमकदार होते.
७) शरीराच्या अंतर्गत सफाईसाठी तांब्याचं पाणी फायदेशीर आहे. याशिवाय हे पाणी यकृत आणि किडनी निरोगी ठेवतं. कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासून बचावासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवणं लाभदायक मानलं जातं.
तांब्याच्या भांड्यातील पाणी कुणी पिऊ नये?
तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे अनेक फायदे असले तरी काही लोकांसाठी हे नुकसानकारक ठरू शकतं. जसे गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी हे पाणी पिऊ नये. तसेच ज्यांना जुलाब, उलटी, मळमळ, गॅस, पोटात जळजळ अशा समस्या नेहमीच असतात त्यांनी सुद्धा हे पाणी टाळावं.
तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे नुकसान
तांब्याच्या भांड्याचा अधिक किंवा चुकीच्या पद्धतीनं वापर केल्यास कॉपर टॉक्सिसिटी होऊ शकते. ज्यामुळे मळमळ, उलटी, पोटदुखी आणि जुलाब अशा समस्या होण्याचा धोका असतो. काही केसेसमध्ये किडनी आणि लिव्हरचं सुद्धा नुकसान होऊ शकतं. तसेच तांब्याच्या भांड्यात कधीच आंबट पदार्थ, फळं ठेवू नये. जसे की, लिंबू, दही.