पाय गरम पाण्यात बुडवून ठेवणं हा उपाय सोपा वाटू शकतो पण शरीराला याचे बरेच फायदे होतात. आपले पाय दिवसभर आपल्या शरीराचा भार उचलतात, तसंच पायांनी आपण तासनतान उभं राहतो, चालतो. अशा स्थितीत शरीरासोबतच मनाला शांती मिळणंही गरजेचं असतं. नियमित याचा वापर केल्यानं अनेक आजारांपासून बचाव होतो. (Which Disease Is Cured By Keeping Feet In Hot Water)
गरम पाण्यात पाय ठेवल्यानं ब्लड सर्क्युलेशन चांगले होते, ताण-तणाव कमी होतो, थकवा दूर होतो. सेल्फ केअर रुटीनमध्ये या पद्धतीचा समावेश करू शकता. ज्यामुळे शरीराची हिलिंग प्रोसेस व्यवस्थित होईल. जर झोपताना तुमच्या पायांमध्ये वेदना होत असतील तर तुम्ही गरम पाण्यात पाय ठेवू झोपू शकता. ज्यामुळे तुमच्या पायांच्या नसांना आराम मिळेल आणि झोपही चांगली येईल. (Which Disease Is Cured By Keeping Feet In Hot Water)
पाय गरम पाण्यात ठेवल्यानं काय होतं?
गरम पाण्यात पाय बुडवून झोपल्यानं शरीराचं तापमान थोडं वाढते ज्यामुळे रक्तप्रवाह व्यवस्थित होतो. ज्यामुळे पायांच्या नसांमध्ये वेदना,ताण-तणाव कमी होतो. तर तुम्हाला दीर्घकाळ उभं राहण्याचं काम करायचं असेल तर ही हिलिंग थेरेपी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. गरम पाणी तुमच्या मांसपेशींना रिलॅक्स करते याशिवाय थकवा गायब करते.
गरम पाण्यात पाय ठेवणं का फायदेशीर
पायांमध्ये पायांमध्ये सूज, वेदना होत असतील ही समस्या टाळता येऊ शकते. ज्यामुळे ताण-तणाव कमी होतो. कारण पायांना आराम दिल्यानं संपूर्ण शरीरावर याचा परिणाम होतो. हिवाळ्याच्या दिवसांत जर तुमचे पाय थंड राहत असतील तर ते गरम करण्यासाठी तसंच रक्त संचार ठीक करण्यासाठी ते फायदेशीर ठरू शकते.
गरम पाण्यात मीठ घालून पाय ठेवण्याचे फायदे
मीठ मिसळल्यामुळे गरम पाण्याचा परीणाम अधिक वाढतो. मिठातील मॅग्नेशियम आणि अन्य खनिजं त्वचेला आराम देतात तसंच सूज कमी करण्यास मदत करतात. यामुळे डिटॉक्सिफिकेशनमध्येही मदत होते. खासकरून पायांवर दुर्गंध येत नाही. मीठाचं पाणी पायांसाठी फायदेशीर ठरते. एप्सम सॉल्ट, सैंधव मिठाचा वापर उत्तम मानला जातो. रोज थंडीत गरम पाण्यात मीठ घालून २० मिनिटं पाय यात ठेवा. ज्यामुळे पायांना वेदनांपासून आराम मिळेल. तसंच पायांना भेगासुद्धा पडणार नाहीत.
ताप आल्यानंतर गरम पाण्यात पाय ठेवल्यानं काय फायदे मिळतात
ताप आल्यनंतर पाय गरम पाण्यात ठेवणं हा जुना उपाय आहे. ज्यामुळे शरीराचं तापमान संतुलित राहतं तसंच ताप हळूहळू कमी होऊ लागतो. तसंच शरीराच्या नसा सक्रिय होता. शरीराची ऊर्जा स्थिर राहते.
