lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > लाल की काळा कोणता माठ वापरावा? माठात 'ही' वस्तू घाला-फ्रिजसारखं थंडगार होईल पाणी

लाल की काळा कोणता माठ वापरावा? माठात 'ही' वस्तू घाला-फ्रिजसारखं थंडगार होईल पाणी

Which Clay Pot is Best For Drinking Water in Summer : रोज वापरण्याच्या माठातलं पाणी जास्तवेळ चांगले राहण्यासाठी काही सोप्या टिप्स तुम्ही वापरू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 12:15 PM2024-03-11T12:15:57+5:302024-03-11T12:35:04+5:30

Which Clay Pot is Best For Drinking Water in Summer : रोज वापरण्याच्या माठातलं पाणी जास्तवेळ चांगले राहण्यासाठी काही सोप्या टिप्स तुम्ही वापरू शकता.

Which Clay Pot is Best For Drinking Water in Summer : Best Clay Pot For Drinking Water Health Benefits | लाल की काळा कोणता माठ वापरावा? माठात 'ही' वस्तू घाला-फ्रिजसारखं थंडगार होईल पाणी

लाल की काळा कोणता माठ वापरावा? माठात 'ही' वस्तू घाला-फ्रिजसारखं थंडगार होईल पाणी

उन्हाळ्याच्या दिवसांत सतत पाणी प्यावसं वाटतं. (Summer Special Tips) थंडगार पाणी प्यायल्याशिवाय तहान पूर्ण झाल्यासारखे वाटतच नाही. पण फ्रिजमधलं पाणी प्यायल्यामुळे सर्दी, खोकला, घसादुखी असे आजार उद्भवतात. म्हणूनच बरेचजण फ्रिजमधलं पाणी पिण्याऐवजी माठातलं पाणी पितात. माठातलं पाणी थंडगार  राहण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयत्न करतात. तर काहीजण नवीन माठ खरेदी करता. लाल, काळा की पांढरा कोणत्या माठात पाणी जास्त थंडगार राहतं अशा प्रश्न अनेकांना पडतो.  रोज वापरण्याच्या माठातलं पाणी जास्तवेळ चांगले राहण्यासाठी काही सोप्या टिप्स तुम्ही वापरू शकता. (Which Clay Pot is Best For Drinking Water  in Summer)

कोणत्या माठातलं पाणी जास्तवेळ थंडगार राहते?

पांढरा माठ सिमेंटपासून बनवला जातो, लाल माठ विटांच्या मातीपासून बनवला जातो तर काळा माठ काळ्या दगडापासून बनवला जातो.  त्यामुळे पाणी जास्त थंड राहतं. फ्रिजच्या पाण्याच्या तुलनेत काळ्या माठातलं पाणी प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होते. काळा माठ घेतल्यानंतर सगळ्यात आधी साबणाच्या पाण्याने आणि साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

त्यानंतर पूर्ण एक दिवस माठात पाणी भरून ठेवा त्यानंतर त्यातलं पाणी काढून घेऊन पुन्हा ताजं पाणी भरून ठेवा. यामुळे माठातलं पाणी गार राहण्यास मदत होईल. पाणी गार राहण्यासाठी पाण्याचा माठ हा बाहेरील बाजूने थंड राहणंही तितकंच महत्वाचे असते. यासाठी एक पांढरा कॉटनचा रूमाल किंवा मोठं कापड ओलं करून माठाच्या चारही बाजूंनी गुंडाळून ठेवा. 

माठातलं पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे (Health Benefits Of Clay Pot For Drinking Water) 

1) माठातलं पाणी पोटासाठी अनेकदृष्या फायदेशीर ठरते. मातीच्या भांड्यात ठेवलेले पाणी नॅच्युरल एल्कलाईन असते. ज्यामुळे पीएच संतुलन चांगले राहण्यास मदत होते. रोज माठातलं पाणी प्यायल्याने गॅस, एसिडिटी यांसारख्या पचनाच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

ओटी पोट सुटलंय, मांड्या पसरट दिसतात? रोज 'या' वेळेत मूठभर मखाणे खा, भराभर घटेल चरबी

2) प्लास्टीकच्या भांड्यांत  बीपीए  यांसारखे हानीकारक केमिकल्स असतात. ज्यामुळे आरोग्याला बरेच फायदे मिळतात. प्लास्टीकच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्याने मेटाबॉलिझ्म मंद गतीने होते आणि वजनही नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

कितीपण खा वजनच वाढत नाही-हडकुळे दिसता? रामदेव बाबा सांगतात १ उपाय, भरपूर ताकद येईल

3) फ्रिजचं पाणी प्यायल्याने घसादुखी, घसा खवखवणं अशा समस्या  उद्भवतात. माठातलं पाणी जास्त  थंड नसल्यामुळे घशाचे नुकसान होत नाही. खोकला, अस्थमा या आजारांनी पीडित असलेल्यांनी फ्रिजचं थंड पाणी पिण्याऐवजी माठातलं पाणी प्यायला हवं. 

Web Title: Which Clay Pot is Best For Drinking Water in Summer : Best Clay Pot For Drinking Water Health Benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.