औषधी गुणांनी परिपूर्ण हळदीचं दूध प्यायल्यानं शरीराला तेव्हाच फायदे होतील जेव्हा तुम्ही योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीनं हळदीचं दूध प्याल. तुम्ही तुमच्या आहारात हळदीच्या दुधाचा आवर्जून समावेश करायला हवा. जर तुम्ही रात्री झोपण्याआधी हळदीचं दूध घेत असाल तर नकारात्मक परिणामही होऊ शकतो (Right Way To Drink Turmeric Milk). रात्री झोपण्याआधी हळदीच्या दुधाचे सेवन करणं टाळायला हवं. अन्यथा तब्येतीवर चुकीचा परिणाम होऊ शकतो. तब्येतीशी संबंधित बऱ्याच समस्या उद्भवू शकतात. (When to not Drink Turmeric Milk)
पचनक्रिया चांगली राहते जे लोक रात्री झोपण्याआधी हळदीचं दूध पितात त्यांना पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात त्यांच्या गट हेल्थवर चुकीचा परिणाम होऊ शकतो. तुम्हालाही जर अशा समस्या उद्भवत असतील तर ही सवय आजच सोडा. ज्यामुळे पोटदुखी, गॅस, ब्लॉटींग,जुलाब, एसिडिटी यांसारख्या पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.
१ ग्रॅम सोन्याच्या मंगळसुत्राच्या १० डिजाईन्स, कमी बजेटमध्ये मंगळसूत्र गळ्यात उठून दिसेल
ब्रिदिंगच्या समस्या
रात्री झोपण्याआधी जर तुम्ही हळदीचे दूध प्यायले तर ब्रिदिंग प्रोब्लेम्सचा सामना करावा लागू शकतो. याव्यतिरिक्त जर तुम्हाला किडनी स्टोनची समस्या असेल तर हळदीचं दूध पिणं टाळायला हवं. हळदीचे दूध ब्लड शुगर लेव्हलवर परिणाम करते. जर तुम्हाला डायबिटीस असेल तर डॉक्टारांच्या सल्ल्याशिवाय हळदीचं दूध पिऊ नका. यामुळे तब्येतीचे विकार उद्भवू शकतत. सकाळी रिकाम्या पोटीसुद्धा हळदीचं दूध पिऊ नये. अन्यथा पोटात जळजळ होऊ शकते. नाश्ता केल्यानंतर दुधाचे सेवन करायला हवे.
जर तुम्ही रात्री झोपण्याआधी हळदीच्या दुधाचे सेवन करत असाल पण जर तुम्हाला दूध पचत नसेल तर दूध पिणं टाळा. अर्धा चमचा किंवा त्यापेक्षा कमीच हळद एक ग्लास दुधात वापरा. जास्त प्रमाणात हळद उष्णता वाढवू शकते. हळदीच्या दुधात पांढरी साखर घालण्याऐवजी गूळ किंवा मध वापरू शकता.
लग्नात शोभून दिसते मधुबाला कडीयाल पैठणी; १० सुंदर कॉम्बिनेशन्स, ब्लाऊजही मिळते देखणे
हळदीतील कर्क्युमिन शरीरात नीट शोषले जाण्यासाठी त्यात चिमूटभर काळी मिरी पूड नक्की घाला. जर तुम्हाला कफचा त्रास नसेल तर रात्री दूध पिणं बंद करू नका. पचायला जड जास्त असेल तर संध्याकाळी ७ पर्यंत हळदीचं दूध पिणं उत्तम ठरेल.
Web Summary : Turmeric milk benefits when consumed correctly. Avoid it at night if you have digestive or breathing issues, kidney stones, or diabetes. It can cause acidity or stomach problems. Consume it after breakfast with jaggery or honey and a pinch of black pepper.
Web Summary : हल्दी दूध तभी फायदेमंद है जब सही तरीके से सेवन किया जाए। पाचन या सांस लेने की समस्या, गुर्दे की पथरी या मधुमेह होने पर रात में इससे बचें। इससे एसिडिटी या पेट की समस्या हो सकती है। इसे नाश्ते के बाद गुड़ या शहद और एक चुटकी काली मिर्च के साथ सेवन करें।