हळदीचे दूध (Turmeric Milk) आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.पण ते सर्वांसाठी नियमित पिणं योग्य नाही. हळदीचे दूध कोणी प्यावे कोणी पिऊ नये याबाबत समजून घेऊ. हळदीचे दूध गोल्डन मिल्क (Golden Milk) असून या दुधाचे बरेच फायदे आहेत. दूध प्यायल्यानं शरीराला बरेच फायदे मिळतात. हळदीच्या दुधाचे सेवन नक्की कसे करावे समजून घेऊ. (Turmeric Milk Benefits And Side Effects)
हळदीचे दूध कोणी प्यावे?
हळदीच्या दुधात असलेले कर्क्युमिन नावाचे तत्व दाह विरोधी आणि एंटीऑक्सिडेंट्स गुणांनी समृद्ध असते. ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी असते त्यांनी हळदीचे दूध प्यायला हवे. हे सर्दी, खोकला यांसारख्या संसर्गजन्या आजारांशी लढण्यास मदत करते. दाहविरोधी गुणांमुळे सांधुदुखी आणि संधीवाताच्या रुग्णांना आराम मिळतो. रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्यास चांगली आणि शांत झोप लागते. हळदीचे एंटीसेप्टिक गुणधर्म त्वचेला चमक आणण्यास मदत करतात.पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि पोटाच्या समस्या कमी करण्यासाठी हे उपयुक्त ठरते.
हळदीचे दूध कोणी पिऊ नये?
गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी हळदीच्या दुधाचे सेवन करू नये.जास्त प्रमाणात सेवन केल्यास गर्भाशयात पेटके येणं, रक्तस्त्राव होणं अशा समस्या उद्भवण्याची शक्यता असते.ज्यांना पित्ताशयात खडे आहेत किंवा यकृताशी संबंधित समस्या आहे त्यांनी हे पिऊ नये. कारण हळद पचनक्रिया बिघडवते.
हळदीचे जास्त सेवन केल्यानं शरीरातील लोह शोषून घेण्याच्या प्रक्रियेत अडथळे येतात.ज्यामुळे एनिमियाच्या रुग्णांची समस्या वाढू शकते. हळदीमध्ये रक्त पातळ करणारे गुणधर्म असतात. जर तुम्ही आधीच रक्त पातळ करणारी औषधं घेत असाल तर हळदीचे दूध पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
हळदीचे जास्त सेवन केल्यानं रक्तदाब आणखी कमी होऊ शकतो. दुधाची एलर्जी असलेल्या लोकांनी हे दूध पिणं टाळावे. हळदीचे दूध बहुतांश लोकांसाठी आरोग्यवर्धक असले तरी ते योग्य प्रमाणातच घ्यावे. तुम्हाला कोणत्याही आरोग्याच्या गंभीर समस्या असतील तर हळदीचे दूध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. हळदीचे जास्त सेवन रक्तदाब आणखी कमी करू शकते. दुधाची एलर्जी असलेल्यांनी हे दूध पिणं टाळावे.
