Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > लहान बाळांना गायीचे दूध कोणत्या महिन्यात देणं योग्य? डॉक्टर सांगतात, चुकीच्या वेळी गायीचं दूध म्हणजे..

लहान बाळांना गायीचे दूध कोणत्या महिन्यात देणं योग्य? डॉक्टर सांगतात, चुकीच्या वेळी गायीचं दूध म्हणजे..

When to give cow milk to babies: Cow milk for infants age: Is cow milk safe for newborns: मुलांना गायीचे दूध कधी द्यायला हवे. त्यासाठी योग्य वय काय जाणून घेऊया डॉक्टरांकडून.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2025 14:28 IST2025-06-13T14:26:15+5:302025-06-13T14:28:05+5:30

When to give cow milk to babies: Cow milk for infants age: Is cow milk safe for newborns: मुलांना गायीचे दूध कधी द्यायला हवे. त्यासाठी योग्य वय काय जाणून घेऊया डॉक्टरांकडून.

When to give cow milk to babies When is it safe to give cow’s milk to infants giving it at the wrong time can be harmful Doctors explain | लहान बाळांना गायीचे दूध कोणत्या महिन्यात देणं योग्य? डॉक्टर सांगतात, चुकीच्या वेळी गायीचं दूध म्हणजे..

लहान बाळांना गायीचे दूध कोणत्या महिन्यात देणं योग्य? डॉक्टर सांगतात, चुकीच्या वेळी गायीचं दूध म्हणजे..

जन्मलेल्या बाळाला आईचे दूध देणे सुरक्षित मानले जाते. सहा महिने तरी आईचे दूध पाजण्याचा सल्ला डॉक्टर आपल्याला देतात.(When to give cow milk to babies) परंतु, बदलेल्या जीवनशैलीनुसार अनेक पालक आपल्या मुलांना गायीचे दूध पाजण्याची घाई करतात.(Cow milk for infants age) पण चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या वयात गायीचे दूध पाजल्याने मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. (Is cow milk safe for newborns)
मुलांच्या बाबतीत पालकांना याबाबतीत काही गोष्टी माहित असणे गरजेचे आहे.(Side effects of early cow milk for babies) पूर्वीच्या काळी बाळ जन्मल्यानंतर गायीचे दूध दिले जायचे.(Baby digestion and cow milk) बरेचदा डॉक्टर बाळाला फॉर्म्युला दूध देण्यास सांगतात.(Cow milk for 6 month baby safe or not) हे दूध गायीच्या दुधापासून बनवले असले तरी पचण्यास हलके असते. पण मुलांना गायीचे दूध कधी द्यायला हवे. त्यासाठी योग्य वय काय जाणून घेऊया डॉक्टरांकडून. 

लघवीचा रंग सांगतो किडनीचे बिघडलेले आरोग्य, ५ लक्षणे- उशीर होण्याआधीच डॉक्टरांकडे जा..

डॉक्टर रवि मलिक म्हणतात की एक वर्षापेक्षा लहान मुलाला गायीचे दूध देत असाल तर वेळीच थांबा. इंडियन अकादमी ऑफ पेडियाट्रिक्स (IAP), अमेरिकन अकादमी ऑफ पेडियाट्रिक्स (AAP) आणि युनिसेफ सारख्या अनेक संस्थांनी देखील लहान बाळाला गायीचे दूध देण्यास मनाई केली आहे. 

गायीच्या दुधात लोह, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि आवश्यक फॅटी ॲसिड नसतात. त्यात प्रथिने, पोटॅशियम, सोडियमचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. ज्यामुळे मुलांच्या किडनीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्यांचे संपूर्ण आरोग्य बिघडते. अनेकदा मुलांना यामुळे ॲलर्जी होऊ शकते. ज्याला CMPI म्हणजे गायीच्या दुधातील प्रथिन्यांची कमतरता असं म्हटले जाते. यामुळे कधीकधी मुलांच्या विष्ठेतून रक्त येऊ शकते. 


डॉक्टर म्हणतात की, आईच्या दुधामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्याची क्षमता असते ज्यामुळे बाळाचे अनेक संसर्गापासून संरक्षण होते. यामध्ये अनेक पोषकद्रव्य असतात जे मुलांच्या वाढीसाठी चांगले असतात. आईचे दूध नवजात बाळ सहज पचवते. तसेच स्तनपानामुळे बाळाचा मेंदू आणि मानसिक विकास अधिक चांगला होतो. 

Web Title: When to give cow milk to babies When is it safe to give cow’s milk to infants giving it at the wrong time can be harmful Doctors explain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.