बरेच लोक दुषित पाणी पिण्याऐवजी घरात आर ओ वॉटर प्युरिफायर लावून घेतात. पण योग्य वेळी फिल्टर बदलत नाहीत. अशावेळी लोकांचा प्रश्न असा असतो की आरओचं फिल्टर खराब झालं की नाही ते कसं ओळखावं. आरओ प्युरिफायरचं साफ पाणी फिल्टरच्या लाईफवर अवलंबून असते. बरेच लोक अशावेळी फिल्टर बदलतात तेव्हा मशीनमधून खराब पाणी येतं किंवा मशीन पाणी देणंच बंद करते. (When To Change RO Filters Signs Of Filter Failure And Tds Guide)
आरओचं पाणी नेहमी प्रमाणित टिडएस असायला हवं. जर आरओमध्ये अधिक टिडीसचं पाणी येत असेल तर तब्येतीसाठी नुकसानकारक ठरू शकतं. एक्सपर्ट्सच्यामते साधारणपणे सेडीमेंट आणि कार्बन फिल्टर दर 6 ते 12 महिन्यांनी बदलून घ्यायला हवं. आरओ मेम्ब्रेन 2 वर्षांपर्यंत व्यवस्थित चालते. ही वेळ परिसराच्या पाण्यातील टिडीएस लेव्हलवर अवलंबून असते. (When To Change RO Filters Signs Of Filter Failure Ans Tds Guide)
आरोग्यतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार दुषित फिल्टर फक्त पाणी अशुद्ध देत नाही तर त्यात बॅक्टेरिया तयार होण्याचा धोकाही वाढतो. म्हणून मशीन पूर्णपणे बंद होण्याची वाटत न पाहता पाण्याची चव आणि पाण्याच्या रंगात होणारा बदल ओळखून वेळीच फिल्टर बदलून घ्या.
पाण्याची चव आणि रंगांवरून अशी ओळखा फिल्टरची स्थिती
जर तुम्हाला पाण्याची चव कडवट किंवा मेटालिक धातूसारखी लागत असेल तर समजून जा की आरओ कार्बन फिल्टर खराब झालं आहे.खराब फिल्टर पाण्यातून क्लोरीन आणि कार्बनिक इम्प्युरिटीज शोषून घेणं बंद करते. ज्यामुळे पाण्यातून एक वेगळाच वास येतो.
जर पाण्यातून मातीसारखा वास येत असेल तर हा सेडीमेंट फिल्टर पूर्णपणे चोकअप झाल्याचे संकेत असतात. पाण्याच्या चवीतील बदल तुमच्या पचनक्रियाला प्रभावित करू शकतो. म्हणून याकडे दुर्लक्ष करू नये.
पाण्याचा वेग आणि मशीनच्या आवाजाकडे लक्ष द्या. जर आरओ पाणी भरण्यासाठी खूप वेळ घेत असेल तर हे फिल्टर लाईफ संपल्याचे संकेत आहेत.
जेव्हा फिल्टरमध्ये खूप कचरा जमा होतो तेव्हा पाण्याचा दबाव कमी होतो आणि पंपावर जोर पडतो ज्यामुळे मशीनमधून आवाज येतो.
आजच्या काही स्मार्ट आरओ मॉडल्सना फिल्टर चेंड इंडिकेटरसुद्धा असते. इंडिकेटर पाहून तुम्ही फिल्टर वेळच्यावेळी बदलू शकता.
Web Summary : Change RO filters every 6-12 months (sediment, carbon) and membrane every two years. Taste, smell, slow water flow, and machine noise indicate replacement needs. Timely filter changes ensures safe drinking water.
Web Summary : आरओ फिल्टर को हर 6-12 महीने (तलछट, कार्बन) और झिल्ली को हर दो साल में बदलें। स्वाद, गंध, पानी का धीमा प्रवाह और मशीन का शोर बदलने की आवश्यकता का संकेत देते हैं। समय पर फ़िल्टर परिवर्तन सुरक्षित पेयजल सुनिश्चित करता है।