Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > गरम पाण्याची पिशवी आणि आईस पॅक कधी वापरावा? कोणत्या दुखण्यांसाठी काय वापरायचं, पाहा

गरम पाण्याची पिशवी आणि आईस पॅक कधी वापरावा? कोणत्या दुखण्यांसाठी काय वापरायचं, पाहा

When should you use a hot water bottle and ice pack : हॉट बॅग (Heat Therapy) रक्ताभिसरण वाढवते आणि स्नायू मोकळे करते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 07:53 IST2025-08-14T07:42:11+5:302025-08-14T07:53:37+5:30

When should you use a hot water bottle and ice pack : हॉट बॅग (Heat Therapy) रक्ताभिसरण वाढवते आणि स्नायू मोकळे करते.

When should you use a hot water bottle and ice pack | गरम पाण्याची पिशवी आणि आईस पॅक कधी वापरावा? कोणत्या दुखण्यांसाठी काय वापरायचं, पाहा

गरम पाण्याची पिशवी आणि आईस पॅक कधी वापरावा? कोणत्या दुखण्यांसाठी काय वापरायचं, पाहा

कोणतीही जखम झाली किंवा सूज आल्यास आईस पॅक लावण्याचा किंवा गरम पाण्याची पिशवी ठेवण्याचा सल्ला दिला जातो. गरम पाण्याची पिशवी कधी वापरावी व आईस पॅक कधी वापरावा ते समजून घेऊया. कारण योग्य पद्धतीनं या उपायांचा वापर केला तरच फायदा होतो. (When should you use a hot water bottle and ice pack)

हॉट बॅग (Hot Bag) कधी वापरावी?

हॉट बॅग (Heat Therapy) रक्ताभिसरण वाढवते आणि स्नायू मोकळे करते. ही थेरपी पाठदुखी, कंबरदुखी, संधीवात स्नायू आखडलेले किंवा गोळा आलेले असताना, मासिक पाळीतील पोटदुखीसाठी फायदेशीर ठरते. यामुळे स्नायूंचा ताण कमी होतो, उष्णता रक्तप्रवाह वाढवते व स्नायूंना रिलॅक्स करते. सांध्यातील वेदना कमी होतात. गरम पाण्याची पिशवी वापरणं काही स्थितीत टाळायला हवं. जसं की त्वचेवर भाजल्यास किंवा खूप गरम पाणी सांडल्यास, सूज व इन्फ्लेमेशन असल्यास तसंच काही ताज्या जखमांवर किंवा फ्रॅक्चरवर गरम पॅक टाळावा.


आईस पॅक (Ice Pack) कधी वापरावा?

थंड थेरपी (Cold Therapy) रक्तप्रवाह कमी करते, सूज कमी करते आणि वेदनांची तीव्रता कमी  करते. ही थेरपी उपयुक्त आहे. नवीन (acute) इजा झाली असताना मुरगाळलेले स्नायू, मुरगळणे, पडणे, सुजलेली जागा, खेळताना लागलेल्या इजा, डोकेदुखी किंवा माइग्रेन यासाठी आईस पॅक उपयुक्त ठरतो.

रक्ताभिसरणाच्या समस्या असल्यास आइस पॅक वापरणे टाळा. उघड्या जखमेवर थेट बर्फ ठेवू नये.इजा झाल्यानंतर प्रथम ७२ तासांसाठी बर्फ उत्तम आहे कारण ते सूज कमी करते, ज्यामुळे वेदना कमी होतात. पण कोणतीही पद्धत १०–१५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ वापरू नये.”

वापरताना काय काळजी घ्यावी

हॉट बॅग किंवा आइस पॅक थेट त्वचेला लावू नये. नेहमी टॉवेल किंवा कापड लपेटून लावा. एका वेळी साधारण १५–२० मिनिटांपेक्षा जास्त वापरू नये. मधुमेह, रक्ताभिसरण समस्या, नसांचे विकार असल्यास वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Web Title: When should you use a hot water bottle and ice pack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.