Join us
Daily Top 2 Weekly Top 5

किती दिवसांनी फेकायला हवी जुनी अंडरवेअर? इन्फेक्शनसह नाजूक जागांची दुखणी वाढण्याचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 15:51 IST

How Often Should You Replace Underwear : एक्सपर्ट सांगतात की, सगळ्याच गोष्टींसोबत अंडरगारमेंट्सचं देखील एक ठरलेलं वय असतं. भलेही ते आपण नेहमी स्वच्छ करतो, ते वरून साफ दिसत असले तर नेहमीसाठी त्यांचा वापर केला जाऊ शकत नाही.

काही गोष्टी असतात ना ज्या आपल्या शरीराच्या संपर्कात नेहमीच राहतात. त्यातील एक म्हणजे अंडरगारमेंट्स. वरच्या कपड्यांच्या तुलनेत अंडरवेअर थेट घाम, बॅक्टेरिया, डेड बॉडी सेल्स आणि दुर्गंधीच्या संपर्कात राहतात.  पण अंडरवेअर केवळ धुणं पुरेसं नाही. आपण अंडरवेअर किती दिवसांनी, महिन्यांनी किंवा वर्षांनी बदलायला हव्यात हेही आपल्याला माहीत असलं पाहिजे.

एक्सपर्ट सांगतात की, सगळ्याच गोष्टींसोबत अंडरगारमेंट्सचं देखील एक ठरलेलं वय असतं. भलेही ते आपण नेहमी स्वच्छ करतो, ते वरून साफ दिसत असले तर नेहमीसाठी त्यांचा वापर केला जाऊ शकत नाही. सामान्यपणे असा सल्ला दिला जातो की, दर ६ ते १२ महिन्यांनी अंडरगारमेंट्स बदलायला हवेत. जसजसे दिवस जातात, तसतसे कापडाच्या धाग्यांमध्ये बदल होतात, ज्यामुळे त्यात बॅक्टेरिया आणि फंगस वाढण्याचा धोका अधिक असतो.

जुन्या अंडरगारमेंट्सचे नुकसान?

जुन्या किंवा व्यवस्थित स्वच्छ न केलेले अंडरगारमेंट्स घातल्याने त्वचेवर खाज, जळजळ, इन्फेक्शन आणि इतर हायजीनसंबंधी समस्या होऊ शकतात. त्यामुळे ते वेळोवेळी बदलणं गरजेचे असतात. डॉ. सौरभ सेठी यांच्यानुसार, अंडरगारमेंट्स रोज स्वच्छ धुणे फार गरजेचे आहे.

सततचा वापर आणि धुण्यामुळे कपड्यांमध्ये छोटे छोटे छिद्र तयार होतात. या छिद्रांमध्ये बॅक्टेरिया, फंगस, डेड स्किन आणि दुर्गंधी अडकून असते. या गोष्टी सामान्य धुलाईने काढणं शक्य नाही. बॅक्टेरिया आणि फंगसमुळे इन्फेक्शन होऊ शकतं. जर इलास्टिक सैल झालं असेल, कापड पातळ झाला असेल किंवा छोटी छोटी छिद्र दिसत असतील तर लगेच अंडरविअर बदला.

उन्हाळ्यात अधिक काळजी घ्या

डॉक्टर सांगतात की, अंडरगारमेंट्स रोज धुतलेले घातले पाहिजे. खासकरून तेव्हा जेव्हा जास्त घाम येत असेल किंवा उन्हाळा असेल. तेच मायो क्लीनिकही सांगतं की, उष्ण, दमट किंवा धुळीच्या वातावरणात अंडरवेअर दिवसातून एकापेक्षा जास्त बदलायला हवेत. जर रोज धुतलेले अंडरगारमेंट्स घातले नाही तर इन्फेक्शनचा धोका अधिक वाढतो.

स्वच्छतेसोबतच फॅब्रिकची निवडही महत्वाची असते. रिसर्च सांगतो की, कॉटनसारखा कापड त्वचेसाठी फायदेशीर असतो. याने ओलावा दूर होतो आणि हवेचा फ्लो सुद्धा चांगला राहतो. ज्यामुळे यीस्ट आणि बॅक्टेरिअल इन्फेक्शनचा धोका कमी होतो. याउलट सिंथेटिक कापडाने ओलावा तसाच राहतो आणि यामुळे जळजळ किंवा अॅलर्जीचा धोका वाढतो.

English
हिंदी सारांश
Web Title : When to replace underwear: Signs of infection risk, hygiene tips.

Web Summary : Underwear should be replaced every 6-12 months to avoid infections. Old underwear harbors bacteria, causing irritation and hygiene issues. Daily washing is crucial, especially in summer. Choose cotton fabrics for better airflow and moisture control.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य