Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > शरीराचं तंत्र बिघडलंय- ५ त्रास एकच गोष्ट सांगतात सतत, टामटूम डिटॉक्सचा विचार सोडा

शरीराचं तंत्र बिघडलंय- ५ त्रास एकच गोष्ट सांगतात सतत, टामटूम डिटॉक्सचा विचार सोडा

Body Detox : ही आपल्या शरीराचीच एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया असते. डिटॉक्सीफिकेशनच्या माध्यमातून शरीरातील विषारी तत्व बाहेर काढले जातात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 16:04 IST2025-12-06T15:21:59+5:302025-12-06T16:04:34+5:30

Body Detox : ही आपल्या शरीराचीच एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया असते. डिटॉक्सीफिकेशनच्या माध्यमातून शरीरातील विषारी तत्व बाहेर काढले जातात.

When is the body in need of a body detox? | शरीराचं तंत्र बिघडलंय- ५ त्रास एकच गोष्ट सांगतात सतत, टामटूम डिटॉक्सचा विचार सोडा

शरीराचं तंत्र बिघडलंय- ५ त्रास एकच गोष्ट सांगतात सतत, टामटूम डिटॉक्सचा विचार सोडा

Body Detox : अनेकदा आपण बॉडी डिटॉक्स हा शब्द ऐकतो किंवा वाचतो. पण अनेकांना ही नेमकी प्रोसेस माहीत नसते. ही आपल्या शरीराचीच एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया असते. डिटॉक्सीफिकेशनच्या माध्यमातून शरीरातील विषारी तत्व बाहेर काढले जातात. डिटॉक्स ही शरीर आणि मेंदूला निरोगी ठेवण्याची प्रक्रिया आहे. याने मानसिक तणाव आणि इतरही आजार दूर ठेवता येतात. तसेच याने शरीराला नवीन ऊर्जा मिळते. बॉडी डिटॉक्सीफिकेशन वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. त्यामुळे डिटॉक्स प्रोग्रॅम सुरु करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पण याची गरज कधी पडते हे आज आपण पाहणार आहोत.

बॉडी डिटॉक्सची गरज कधी असते?

घाण किंवा विषारी तत्व केवळ आपल्या आजूबाजूला असतात असे नाही तर आपल्या शरीरातही असते. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांचा आपल्याला सामना करावा लागतो. त्यात तणाव, झोप न लागणे, थंडी वाजून ताप येणे, पचन व्यवस्थित न होणे आणि वजन वाढणे यांसारख्या समस्यांचा समावेश आहे. वेळेवर यांच्यावर उपाय केले गेले नाही तर हे आजार गंभीर रुप धारण करु शकतात. 

झोप न येणे

जर आपल्याला रात्री चांगली झोप येत नसेल तर तुमच्या शरीरात विषारी तत्वांचा प्रवेश झाला असे समजा. यासाठी भरपूर झोप घेण्यासाठी वेगवेगळे उपाय करा. झोप चांगली लागली तर दिवसभर तुम्हाला चांगली एनर्जी मिळते. झोप पूर्ण न झाल्यास डोकं जड होणे, आळस येणे, कशात मन न लागणे याही समस्या होतात. 

आळस येणे

आळस आल्याने दिवसभर कशातही लक्ष न लागणे. कोणतही काम करताना ऊर्जा नसणे हे तुमच्या शरीरावर विषारी तत्वांनी ताबा मिळवला याचे संकेत आहेत. अशात मद्यसेवन, साखर, रिफाइंड कार्बोहायड्रेट्स, प्रोसेस्ड फूड टाळा. अशावेळी जास्तीत जास्त पाणी पिणे आणि हिरव्या भाज्या खाणे फायदेशीर असतं. 

तणाव असणे

विषारी तत्वांमुळे सतत तणाव जाणवतो. तणावामुळे शरीराच्या वेगवेगळ्या क्रिया प्रभावित होतात. पर्यावरणातील प्रदूषण, किटकनाशके तसेच जंक फूडमुळे तणाव वाढतो. तणावामुळे शरीरात विषारी तत्वांचा प्रभाव वाढतो, याला टॉक्सीक फ्रि रॅडिकल्स म्हटले जाते. 

वजन वाढणे

वजन वाढणे हे सुद्धा तुमच्या शरीरात विषारी तत्त्व वाढले याचा संकेत आहे. जास्त करुन आहाराच्या चुकीच्या सवयीं असणारे लोक या समस्येने पीडित असतात. हे लोक खातात-पितात जास्त. जेवढ्या जास्त कॅलरी ते घेतात तितक्या कमी खर्च करतात. त्यामुळे कॅलरी ऊर्जेला चरबीच्या रुपात जमा करुन वजन वाढतं. अशावेळी तेवढंच खावं जेवढं तुम्ही पचवू शकता. 

पचनक्रिया बिघडणे

ही एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया जी बिघडली की समजा तुम्ही काहीतरी चुकीचं करताय. पोटात गॅस होणे, अपचन, जळजळ होणे, वेदना, उलटी होणे इत्यादी याची लक्षणे आहेत. पोट हे सर्व समस्यांचं मूळ आहे. त्यामळे पोटासोबत उगाच प्रयोग करु नका.  

Web Title : शरीर का तंत्र बिगड़ा? ये पाँच संकेत बताते हैं डिटॉक्स की ज़रूरत।

Web Summary : शरीर को डिटॉक्स करना ज़रूरी है ताकि विषैले तत्वों को निकाला जा सके, तनाव कम हो और ऊर्जा बढ़े। अनिद्रा, थकान, तनाव, वजन बढ़ना और पाचन संबंधी समस्याएँ प्राकृतिक डिटॉक्स की ज़रूरत का संकेत देती हैं। कोई भी डिटॉक्स प्रोग्राम शुरू करने से पहले डॉक्टर से सलाह लें।

Web Title : Body's system failing? Five signs your body needs detox, naturally.

Web Summary : Body detox is essential for removing toxins, reducing stress, and boosting energy. Signs like insomnia, fatigue, stress, weight gain, and digestive issues indicate a need for natural detoxification. Consult a doctor before starting any detox program.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.