Join us
Daily Top 2 Weekly Top 5

जिभेवरचा पांढरा किंवा पिवळ्या रंगाचा थर कशाचं लक्षणं? पाहा कशाने जिभ दिसते खराब

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 16:40 IST

White Or Yellow Tongue: जिभेचा रंग तापापासून ते पोट बिघडण्याचा संकेत देतो. हेच कारण आहे की, आपण जेव्हाही डॉक्टरांकडे जातो, तेव्हा डॉक्टर आधी जीभ बघतात.

White Or Yellow Tongue: जिभेने केवळ टेस्टच समजत नाही तर ती आरोग्याचे अनेक संकेतही देत असते. जिभेचा रंग आणि त्यावरील थर वेगवेगळ्या समस्येचे संकेत देत असतो. डॉक्टर सुद्धा जीभ बघूनही अनेक समस्यांचा अंदाज लावू शकतात. जिभेचा रंग तापापासून ते पोट बिघडण्याचा संकेत देतो. हेच कारण आहे की, आपण जेव्हाही डॉक्टरांकडे जातो, तेव्हा डॉक्टर आधी जीभ बघतात. जर सकाळी आपल्या जिभेवर पांढरा किंवा पिवळा थर दिसत असेल तर शरीरात टॉक्सिन वाढत आहे असं समजा.

जिभेवर पांढरा किंवा पिवळा थर का जमा होतो?

जर सकाळी जिभेवर पांढरा किंवा पिवळा थर दिसणं हा शरीरात टॉक्सिन वाढण्याचा संकेत असू शकतो. ज्यामुळे मेटाबॉलिज्म स्लो होऊन पचन तंत्र आणि आतडीही प्रभावित होते. आयुर्वेदात टॉक्सिनला खूप नुकसानकारक मानलं आहे. शरीरात टॉक्सिन तेव्हा वाढतात, जेव्हा विषारी पदार्थ बाहेर निघण्याऐवजी आतच जमा होतात. असं झाल्याने मेटाबॉलिज्म स्लो होतं आणि अन्न पोटातच सडू लागतं. अशात पोटदुखी, बद्धकोष्ठता, गॅस अशा पोटासंबंधी समस्या होऊ लागतात. याचा प्रभाव तोंड आणि जिभेवर दिसू लागतो. ही काही फक्त पोटासंबंधी समस्या नाही. टॉक्सिनने हळूहळू रक्तही अशुद्ध होतं आणि पुढे जाऊन डायबिटीस आणि हृदयरोगांचा देखील धोका वाढतो.

शरीरात वाढलेले टॉक्सिन घातक का?

शरीरात टॉक्सिन वाढल्याने सूज, गॅस, बद्धकोष्ठता आणि पचनासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. टॉक्सिन जास्त काळ राहिल्यास रक्त अशुद्ध होतं. ज्यामुळे डायबिटीस आणि हृदयरोगांचा धोका वाढतो.

जिभेची समस्या कशी दूर कराल?

- १४ ते १६ तास उपवास केल्याने पचन तंत्राला आराम मिळतो. शरीराची सफाई वेगनाने होते आणि मेटाबॉलिज्म रीसेट होतं.

- जिरे, धणे आणि बडीशेपचा काढा घेतल्यानेही शरीरातील टॉक्सिन बाहेर पडतात. दिवसभर हा काढा घोट घोट करत घेतल्यास ब्लॉकेज खुलतात आणि शरीरात जमा झालेले टॉक्टिसन हळूहळू बाहेर पडतात.

काय टाळावं?

दिवसभर जर थंड पाणी पित असाल तर शरीरात टॉक्सिन जमा होण्याची शक्यता वाढते. तसेच बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते. थंड पाणीऐवजी हलकं कोमट पाणी प्यावं.

English
हिंदी सारांश
Web Title : White/Yellow Tongue Coating: Causes, Health Signals, and Removal Tips

Web Summary : A white or yellow tongue coating signals toxins, slow metabolism, and digestive issues. Ayurveda links toxins to various health problems. Fasting, herbal remedies like cumin-coriander-fennel tea, and avoiding cold water can help eliminate toxins and improve health.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य