Join us
Daily Top 2 Weekly Top 5

आपल्या आरोग्याबाबत खूपकाही सांगतात पापण्या, 'या' ४ बदलांकडे दुर्लक्ष करणं पडेल चांगलंच महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 10:57 IST

Eyelashes Nutritional Deficiencies: डोक्यावरील केसांच्या तुलनेत पापण्या हळूहळू वाढतात, त्यामुळे शरीरात सुरू असलेल्या काही समस्या त्या लवकरच दाखवू शकतात.

Eyelashes Nutritional Deficiencies:  पापण्या केवळ डोळ्यांच्या सौंदर्यासाठीच नसतात, तर डोळ्यांच्या संरक्षणातही त्यांची महत्त्वाची भूमिका असते. शिवाय, पापण्यांची जाडी, लांबी किंवा मजबुती यामधील बदल शरीरातील आरोग्यविषयक समस्यांचे संकेत देऊ शकतात. डोक्यावरील केसांच्या तुलनेत पापण्या हळूहळू वाढतात, त्यामुळे शरीरात सुरू असलेल्या काही समस्या त्या लवकरच दाखवू शकतात. चला तर जाणून घेऊया पापण्यांमधील बदल कोणत्या समस्यांकडे इशारा करतात.

पापण्या कोणत्या समस्यांचे संकेत देतात?

1) पोषक तत्त्वांची कमतरता

पापण्या पातळ होणे, विरळ दिसणे किंवा कमकुवत होणे हे पोषणाच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. खासकरून बायोटिन, आयर्न, झिंक, व्हिटामिन D आणि प्रोटीन हे पापण्यांच्या वाढीसाठी आवश्यक पोषक तत्त्वे आहेत. यांची कमतरता असल्यास पापण्या गळणे किंवा कमकुवत होणे दिसू शकते.

2) थायरॉईड आणि हार्मोनल असंतुलन

2024 मध्ये Journal of Clinical and Translational Endocrinology मध्ये प्रकाशित अहवालानुसार, अनियंत्रित हायपोथायरॉयडिझममुळे पापण्या भरपूर गळू शकतात. हायपोथायरॉयडिझम किंवा हायपरथायरॉयडिझम यांसारख्या स्थितींमध्ये पापण्या पातळ, कमकुवत किंवा विरळ होऊ शकतात म्हणजेच पापण्यांच्या समस्या हार्मोनल असंतुलनाचा इशारा देऊ शकतात.

3) ऑटोइम्यून आजार आणि ताणतणाव

2022 मध्ये Journal of Dermatology and Clinical Research मध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, ऑटोइम्यून आजार, हार्मोनल विकार आणि इतर वैद्यकीय स्थिती यांमुळे पापण्या व भुवया पातळ होणे किंवा गळणे या समस्या होऊ शकतात. एलोपेशिया एरियाटासारख्या ऑटोइम्यून स्थिती किंवा अतिताण यामुळेही पापण्यांवर परिणाम होऊ शकतो.

4) पापण्यांचे संसर्ग आणि सूज

पापण्यांचे गळणे, कमकुवतपणा किंवा विरळपणा हा पापण्यांतील संसर्ग किंवा सूजेचा संकेत असू शकतो. ब्लेफेरायटिससारख्या स्थितींमध्ये पापण्या पातळ व नाजूक होतात.

काय करावे?

- आहारात आवश्यक पोषक तत्त्वे समाविष्ट करा

- थायरॉईड/हार्मोन तपासणी गरजेप्रमाणे करून घ्या

- डोळ्यांची स्वच्छता ठेवा, संसर्गाची लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

- जास्त ताण टाळा

English
हिंदी सारांश
Web Title : Eyelash changes signal health issues: Don't ignore these four signs!

Web Summary : Changes in eyelashes can indicate nutritional deficiencies, thyroid issues, autoimmune diseases, or infections. Thinning, weakening, or loss of lashes warrants attention to diet, hormone levels, and eye hygiene. Consult a doctor for persistent symptoms.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य