विविध प्रकारचे फायदे मिळवण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करत असतो. (What will happen if you drink a glass of hot water in the morning? See how beneficial this simple remedy is)त्यातील काही फार सोपे असतात तर काही फार महाग असतात. वजन कमी करण्यासाठी आपण विविध ब्रॅण्डचे प्रॉडक्ट्स वापरतो. तसेच पचन चांगले व्हावे म्हणून काही औषधे घेतो. पावसाळ्यात सारखा सर्दी खोकला होतो. ताप येतो. त्यासाठीही डॉक्टरकडे जातो औषधांवर भरपूर खर्च करावा लागतो. मात्र काही साध्या सवयी लावून घेतल्या तर फार जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत.
काही अगदी साधे घरगुती उपाय असतात. जे करायला अगदी सोपे असतात. आपल्याला माहिती ही असतात. मात्र आपण करत नाही. रोजच्या दिनचर्येत काही गोष्टींचा समावेश केल्याने आणि काही सवयी लावून घेतल्याने पुढे जास्त त्रास होत नाही. अनेक आजार होण्यापासून टाळता येतात. असाच एक अगदी साधा व सोपा उपाय आहे. जो करणे सगळ्यांसाठी नक्कीच शक्य आहे. रोज सकाळी उठल्यावर एक ग्लास भर गरम पाणी पिणे. ही एक गोष्ट रोज नेमाने केल्याने आरोग्यासाठी चांगले ठरते. १. गरम पाणी सकाळी सकाळी प्यायल्यामुळे शरीरातील विविध कार्यप्रणालींना चालना मिळते. (What will happen if you drink a glass of hot water in the morning? See how beneficial this simple remedy is)खास म्हणजे पचन क्रियेला फायदा होतो. गरम पाण्यामुळे पचन सक्रिय होते आणि चांगले होते. पोट साफ होण्यात मदत होते. जर सकाळी उठल्यावर पोट नीट साफ होत नसेल तर गरम पाणी प्यायल्याने ती समस्या बंद होते.
२. शरीरातील विषारी त्रासदायक द्रव्ये शरीराबाहेर काढण्याचे काम गरम पाणी करते. तसेच जंतू-विषाणू शरीरात शिरत नाहीत आणि असतील तर बाहेर जातात. आरोग्य चांगले राहते. घशालाही त्रास होत नाही. खोकला सर्दी सारख्या समस्या उद्भवतच नाहीत.
३. रक्ताभिसरण सुधारते. गरम पाणी रक्ताभिसरण सुधारण्यात मदत करते. हृदयाच्या आरोग्यासाठीही ते चांगले असते. वजन कमी करण्यासाठीही मदत होते. गरम पाण्यामुळे सगळ्या शारीरिक प्रक्रिया कार्यशील होतात तसेच फॅट बर्निंगही होते. त्यामुळे रोज सकाळी एक भांड गरम पाणी पिऊन दिवसाची सुरवात करा. पावसाळ्यात आणि थंडीत तर गरम पाणीच प्यावे.