उन्हाळ्याच्या दिवसांत माठातील नैसर्गिकरित्या थंड झालेले पाणी पिणे आरोग्यासाठी अत्यंत सुखद असते. फ्रीजच्या पाण्यापेक्षा माठातील पाणी घशासाठी आणि पचनासाठी उत्तम मानले जाते. परंतु, नवीन माठ विकत घेताना तो योग्य गुणवत्तेचा असणे गरजेचे आहे. नवीन माठ घेताना खालील गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. (What to Look for When Buying an Earthen Pot for Healthy Water)
१. मातीचा दर्जा आणि रंग
माठ घेताना तो कोणत्या मातीपासून बनला आहे हे पाहावे. नैसर्गिक लाल किंवा काळ्या मातीचे माठ आरोग्यासाठी चांगले असतात. माठाचा रंग सर्वत्र सारखा असावा. जर माठावर गडद रंगाचे डाग असतील किंवा तो अर्धवट भाजलेला वाटत असेल, तर असा माठ घेऊ नये. व्यवस्थित भाजलेला माठ अधिक काळ टिकतो आणि पाणी चांगले थंड करतो.
२. माठ वाजवून पाहणे (Sound Test)
माठ कच्चा आहे की पक्का हे ओळखण्यासाठी त्यावर हाताने हलकेच टिचकी मारून पहावी. जर धातूसारखा स्पष्ट 'टणक' आवाज आला, तर समजावे की माठ व्यवस्थित भाजलेला आणि मजबूत आहे. जर आवाज 'धप-धप' असा बसका आला, तर तो माठ कच्चा असू शकतो किंवा त्याला कुठेतरी तडा गेलेला असू शकतो.
३. तडे किंवा भेगा तपासणे
अनेकदा माठाला अत्यंत सूक्ष्म भेगा असतात, ज्या डोळ्यांना लगेच दिसत नाहीत. माठ हातात घेऊन तो प्रकाशात फिरवून सर्व बाजूंनी तपासावा. विशेषतः माठाचा तळ आणि गळा नीट पाहावा. जर भेगा असतील, तर कालांतराने तिथून पाणी झिरपायला लागते आणि माठ फुटण्याची शक्यता असते.
४. झिरपण्याची क्षमता
मातीचा माठ पाणी थंड करतो कारण त्यातील सूक्ष्म छिद्रांमधून पाणी बाहेर झिरपते आणि त्याचे बाष्पीभवन होते. माठ घेताना तो जास्त गुळगुळीत किंवा पॉलिश केलेला नसावा. खूप जास्त पेंट किंवा केमिकल कोटिंग केलेले माठ दिसायला सुंदर दिसतात, पण ते पाणी थंड करण्याचे काम नीट करत नाहीत. नैसर्गिक सच्छिद्रता असलेला माठच निवडावा. (What to Look for When Buying an Earthen Pot for Healthy Water)
५. आकार आणि नळ
आजकाल नळ असलेले माठ मोठ्या प्रमाणावर मिळतात. नळ व्यवस्थित बसवलेला आहे की नाही आणि तिथून पाणी गळत नाहीये ना, याची खात्री करा. तसेच, माठाचे तोंड रुंद असावे, जेणेकरून तो आतून स्वच्छ करणे सोयीचे होईल.
Web Summary : Ensure a quality earthen pot for cool water by checking the clay, sound, cracks, porosity, and tap. Choose natural materials for optimal cooling and health benefits.
Web Summary : ठंडा पानी पाने के लिए घड़ा खरीदते समय मिट्टी, आवाज, दरारें, सरंध्रता और नल की जांच करें। बेहतर शीतलन और स्वास्थ्य लाभों के लिए प्राकृतिक सामग्री चुनें।