Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कोरड्या खोकल्याने घसा, छाती दुखतेय? करा 'हे' सोपे घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम

कोरड्या खोकल्याने घसा, छाती दुखतेय? करा 'हे' सोपे घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम

Dry Cough : आयुर्वेदानुसार काही औषधी वनस्पतींचा योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने आहारात समावेश केल्यास कोरड्या खोकल्यापासून लवकर आराम मिळू शकतो. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 09:45 IST2026-01-01T09:39:16+5:302026-01-01T09:45:55+5:30

Dry Cough : आयुर्वेदानुसार काही औषधी वनस्पतींचा योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने आहारात समावेश केल्यास कोरड्या खोकल्यापासून लवकर आराम मिळू शकतो. 

What to eat to get instant relief from dry cough | कोरड्या खोकल्याने घसा, छाती दुखतेय? करा 'हे' सोपे घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम

कोरड्या खोकल्याने घसा, छाती दुखतेय? करा 'हे' सोपे घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम

Dry Cough : थंडी, वातावरणातील बदल, प्रदूषण, चुकीचा आहार या गोष्टींमुळे अनेकांना नेहमीच कोरडा खोकला होत राहतो.कोरडा खोकला म्हणजे मोठी डोकेदुखी, कारण हा झाला तर जराही चैन पडत नाही. खोकून खोकून घसा, छाती दुखायला लागते. ना धड काम होत ना आराम मिळत. सामान्यपणे कोरडा खोकला झाला की बरेच लोक लगेच औषधे किंवा सिरप घेतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, कोरडा खोकला घालवण्याचे नॅचरल उपाय आपल्या किचनमध्येच असतात. आयुर्वेदानुसार काही औषधी वनस्पतींचा योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने आहारात समावेश केल्यास कोरड्या खोकल्यापासून लवकर आराम मिळू शकतो. चला तर मग अशाच काही उपयुक्त औषधी घटकांबद्दल जाणून घेऊया.

कोरडा खोकला दूर करण्याचे उपाय

मध – मध घशासाठी खूपच फायदेशीर मानलं जातं. तुम्ही फक्त एक ते दोन चमचे मध कोमट पाण्यासोबत सेवन करा. कोरड्या खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी हा नैसर्गिक उपाय नक्की करून पाहू शकता. मधाने घशाला शेक मिळतो आणि खोकला कमी होतो.

जेष्ठमध – जुन्या काळापासून घशाच्या त्रासावर जेष्ठमध सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. जेष्ठमधामध्ये भरपूर औषधी गुणधर्म आढळतात. कोरड्या खोकल्यावर आराम मिळवण्यासाठी जेष्ठमधाचा काढा करून प्या. हवं असल्यास जेष्ठमधाची मुळे चघळू शकता.

आले – घसा दुखत असताना आजी-दादी आल्याचा चहा पिण्याचा सल्ला द्यायच्या. आल्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. आल्याचा रस मधासोबत घेतल्यास कोरड्या खोकल्यावर आराम मिळू शकतो.

हळद – हळद आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. तज्ज्ञांच्या मते हळदीचे सेवन घशासाठी उपयुक्त आहे. कोरड्या खोकल्यापासून सुटका हवी असल्यास आहारात पोषक घटकांनी भरलेले हळदीचे दूध नक्की समाविष्ट करा.

Web Title : सूखी खांसी से राहत: गले और छाती के दर्द के लिए घरेलू उपाय

Web Summary : शहद, मुलेठी, अदरक या हल्दी दूध से सूखी खांसी को शांत करें। ये प्राकृतिक उपचार गले और छाती के दर्द से राहत दिलाते हैं।

Web Title : Dry cough relief: Simple home remedies for throat and chest pain.

Web Summary : Soothe a dry cough with honey, licorice, ginger, or turmeric milk. These natural remedies offer relief from throat and chest pain.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.