Join us

जिभेचा रंग बदलणं हा आजार की मोठ्या आजाराचं लक्षणं? एक्सपर्टनी सांगितलं, रंग बदलला तर..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 20:33 IST

Tongue colour symptoms: आयुर्वेद न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी जिभेवर आरोग्यासंबंधी काय लक्षणं दिसतात याची माहिती दिली आहे.

Tongue colour symptoms: डॉक्टर गेल्यावर आपण पाहिलं असेल की, डॉक्टर डोळे आणि जीभ बघतात. याचं कारण शरीरात जर काहीही गडबड झाली असेल तर त्याचे संकेत जिभेवर दिसतात. जीभ केवळ चव जाणून घेण्यासाठी नाही तर आपल्या आरोग्याचा आरसा देखील असते. आयुर्वेदात सांगण्यात आलं आहेकी, जिभेचा रंग शरीरात होत असलेल्या बदलांची माहिती देतो. आयुर्वेद न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी जिभेवर आरोग्यासंबंधी काय लक्षणं दिसतात याची माहिती दिली आहे. चला पाहुयात आरोग्याबाबत काय सांगतो जिभेचा रंग...

श्वेता शाह यांनी सांगितलं की, जिभेचा रंग पिवळा, लाल, निळा किंवा फिक्कट दिसत असेल किंवा जिभेवर काही खूण दिसत असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.

पिवळा रंग

श्वेता शाह सांगतात की, जर आपल्या जिभेवर पिवळेपणा दिसत असेल तर शरीरात पित्त दोष वाढणे, अॅसिडिटी किंवा बाइल ज्यूसमध्ये अंसतुलनाचे संकेत असू शकतात. अशात रोज जेवण केल्यानंतर ५ तुळशीची पानं आणि एक वेलची खाणं फायदेशीर ठरेल. यामुळे पित्त शांत होईल आणि पचनही चांगलं होईल.

फिक्कट रंग

जर जिभेचा रंग खूप फिक्कट किंवा पांढरा दिसत असेल तर हा हीमोग्लोबिन कमी, कमजोरी अॅनिमियाचा संकेत असू शकतो. अशात रोज सकाळी भिजवलेले अंजीर आणि थोडा गूळ खायला हवा. यानं रक्ताचं प्रमाण वाढेल आणि शरीराला एनर्जी मिळेल.

लाल चट्टे

जिभेच्या किनाऱ्यावर किंवा टोकावर लाल चट्टे दिसत असतील तर हे मानसिक तणाव, हृदय किंवा हार्मोन्समध्ये बदलाचे संकेत असू शकतात. अशात रात्री झोपताना उशीजवळ गुलाबाच्या पाकळ्या, ब्राम्ही आणि लॅवेंडर ऑइल ठेवून झोपा. यानं मन शांत होईल आणि झोपही चांगली लागेल.

निळी किंवा जांभळी जीभ

जर जिभेचा रंग निळा किंवा जांभळा दिसत असेल तर याची कारणं शरीरात रक्तप्रवाह कमी होणे, ऑक्सीजन कमी किंवा जास्त तणाव असू शकतात. अशात रोज १० मिनिटं अनुलोम-विलोम प्राणायाम करा आणि रात्री दुधात १ चमचा हळद टाकून प्या. यानं रक्तप्रवाह सुधारतो आणि शरीरात ऑक्सीजन सप्लाय वाढतो.

गुलाबी जीभ

न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, जर जीभ गुलाबी आणि साफ असेल तर हा चांगलं पचन तंत्र आणि शरीरात सगळं चांगलं असल्याचा संकेत असतो. याचा अर्थ असा की, आपण योग्य आहार आणि जीवनशैली फॉलो करत आहात. 

श्वेता शाह सांगतात की, रोज सकाळी ब्रश करताना जिभेवरही लक्ष द्या. ही आपल्या आरोग्याची स्थिती जाणून घेण्याची सोपी पद्धत आहे. जर रंगात काही बदल दिसत असेल तर समजा की, शरीरात काहीतरी गडबड आहे.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स