Join us
Daily Top 2 Weekly Top 5

रोज किती वाजता जेवता? डॉक्टर सांगतात जेवणाची योग्य वेळ; कसं, किती खावं-पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 20:23 IST

What Time Do You Eat Every Day : डॉ, सौरभ सेठी सांगतात की रात्री उशीरा खाल्ल्यानं शरीराचं नॅच्युरल बायोलॉजिकल क्लॉक बिघडते

जर तुम्ही हेल्दी खाल्ल्यानंतरही तुम्हाला थकवा येणं. ब्लोटींग, झोप न येणं अशा समस्या उद्भवत असतील तर तुम्ही तुमच्या आहार घेण्याच्या पद्धतीत बदल करायला हवा.  हार्वर्ड आणि स्टॅनफोर्डचे ट्रेंड गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांना सोशल मीडियावर गट डॉक्टर या नावानंही ओळखलं जातं. अलिकडेच त्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी सांगितले की तुमच्या जेवणाची वेळ काय आहे हे तुम्ही काय खाता, किती खाता यापेक्षाही  जास्त महत्वाची असते. डॉ. सेठी यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.

 डॉ, सौरभ सेठी सांगतात की रात्री उशीरा खाल्ल्यानं शरीराचं नॅच्युरल बायोलॉजिकल क्लॉक बिघडते. या दरम्यान इंसुलिन सेंसिटीव्हीटी ५० टक्के कमी होऊन ४० टक्क्यांवर येते. ज्यामुळे ब्लड शुगर कंट्रोल करणं कठीण होतं. याशिवाय फॅट्स बर्न होण्याची प्रक्रियाही थंड होते.

 रात्रीच्यावेळी शरीरातील मेलाटोनिन हॉर्मोन वाढतो. जो चांगल्या झोपेसाठी महत्वाचा असतो. जेव्हा तुम्ही उशीरा जेवता तेव्हा हेच हॉर्मोनल डायजेशन खराब होते. ज्यामुळे शरीराला रिपेअर आणि डिटॉक्स व्हायला व्यवस्थित वेळ मिळत नाही. ज्यामुळे सकाळी उठल्यानंतर थकवा येणं, ब्लॉटींग अशा समस्या उद्भवतात.

लवकर जेवण्याचे फायदे

रिसर्च सांगतो की जे लोक संध्याकाळी  ७ च्या आधी रात्रीचं जेवतात त्याचं रात्रीच्यावेळी ब्लड ग्लुकोज जवळपास १५ टक्के कमी झालेलं दिसून आलं. याव्यतिरिक्त इंसुलिन सेंसिटिव्हीटी चांगली राहते. तसंच झोपेच्या क्वालिटीमध्येही चांगला परिणाम दिसून येतो.  लवकर जेवल्यानं शरीराला खाल्लेल्या अन्नाचं पचन करायला पुरेसा वेळ मिळतो. ज्यामुळे एसिड रिफ्लेक्स, गॅस, अपचन यांसारख्या समस्या कमी होतात.  यामुळे रात्री उशीरापर्यंत खाण्याची सवय  टाळता येते.

डायबिटीस आणि फॅटी लिव्हर असलेल्यांनी उशीरा डिनर करू नये. डॉ. सेठी सांगतात की डायबिटीज, प्रीडायबिटीज आणि फॅटी लिव्हर असलेले रुग्ण शुगर स्पाईक ३० ते ५० टक्के वाढवू शकतात. अशा स्थितीत लवकर जेवणं हॉर्मोनल संतुलन चांगले ठेवते तसंच ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यासही मदत होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Optimal Dinner Time: Doctors Explain When and How to Eat

Web Summary : Eating late disrupts the body's clock, impacting insulin and fat burning. Early dinners, before 7 PM, improve blood sugar, insulin sensitivity, and sleep. This helps digestion and prevents issues like acid reflux, benefiting those with diabetes or fatty liver.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य