सध्याच्या धावपळीच्या आणि बदलत्या लाईफस्टाईलमध्ये अनेकजण आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्यांनी हैराण आहेत. आरोग्याच्या वेगवेगळ्या लहान - मोठ्या तक्रारींमधील एक मोठी आणि फारच कॉमन समस्या म्हणजे हाय कोलेस्टेरॉल. शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यामुळे हृदयविकार, ब्लॉकेज किंवा रक्तदाबासारख्या अनेक समस्या (best foods to lower bad cholesterol) निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवणे खूप महत्त्वाचे असते. योग्य आहार घेतल्यास कोलेस्टेरॉल नैसर्गिकरीत्या कमी करता येते आणि शरीर तंदुरुस्त राहते. कोलेस्टेरॉल एक प्रकारचे फॅट आहे, जे शरीर स्वतः तयार करते याचबरोबर ते अनेक खाद्यपदार्थांमध्येही भरपूर प्रमाणात असते(Doctor Tells Best Foods That Help Lower Bad Cholesterol).
निरोगी राहण्यासाठी शरीराला कोलेस्टेरॉलची गरज असते. कोलेस्टेरॉल दोन प्रकारचे असते - एक गुड कोलेस्टेरॉल(HDL) आणि दुसरे बॅड कोलेस्टेरॉल (LDL). आपल्यापैकी प्रत्येकाचा प्रयत्न असतो की शरीरातील गुड कोलेस्टेरॉल वाढावे आणि वाईट कोलेस्टेरॉल कमी व्हावे. पण, जोपर्यंत आपल्या आहारात आवश्यक बदल करत नाही, तोपर्यंत बॅड कोलेस्टेरॉल कमी करणे कठीण होते. आपल्या रोजच्या आहारात काही खास पदार्थांचा समावेश केल्यास बॅड कोलेस्टेरॉल कमी होतो आणि चांगल्या कोलेस्टेरॉलची मात्रा वाढते. व्हॅस्कुलर सर्जन आणि व्हॅरिकोज व्हेन्स स्पेशलिस्ट डॉ. सुमित कपाडिया यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर (superfoods to reduce cholesterol levels) एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी असे काही खाद्यपदार्थ सांगितले आहेत, जे बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात. आपण असे काही सोपे आणि सहज उपलब्ध होणारे पदार्थ पाहणार आहोत, ज्यांचा आहारात समावेश करून आपण आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नैसर्गिकरित्या कमी करू शकता. कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी कोणते पदार्थ खाणे फायदेशीर आहे ते पाहा...
कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी कोणते पदार्थ खाणे फायदेशीर आहे ते पाहा...
१. मेथी :- आपल्या सगळ्यांच्याच घरातील मसाल्याच्या डब्यात मेथीचे दाणे कायम असतात. मेथीचे पिवळे दाणे (Fenugreek Seeds) जेवणाची चव तर वाढवतातच, पण आरोग्यासाठीही ते खूप फायदेशीर असतात. मेथीमध्ये भरपूर प्रमाणात सोल्यूबल फायबर असते. मेथी खाल्ल्याने कोलेस्टेरॉल आतड्यांमध्ये जमा होत नाही. मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्यानंतर सकाळी खाऊ शकता.
२. नारळ :- शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी खोबर आपण मर्यादित प्रमाणात खाऊ शकता, म्हणजेच रोज न खाता कधीतरी खाऊ शकता. नारळ शरीरातील गुड कोलेस्टेरॉल पातळी वाढवतो. आपण खोबर किसून नारळ खाऊ शकता , वेगवेगळ्या पदार्थांमध्ये किसून वापरू शकता किंवा नारळाचे तेल देखील वापरू शकता. हे सर्व प्रकारे शरीरासाठी फायदेशीर आहेत. मात्र, गरजेपेक्षा जास्त नारळ खाणे टाळले पाहिजे.
३. भेंडी :- भेंडी एक सुपरफूड आहे, ज्यामध्ये भरपूर प्रमाणात म्यूसिलेज (एक प्रकारचा चिकट पदार्थ) असतो. हा म्यूसिलेज शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करून ते शरीराबाहेर काढून टाकतो.
४. सफरचंद :- पेक्टिन आणि अँटी-ऑक्सिडंट्सयुक्त असलेले सफरचंद शरीरासाठी खूपच फायदेशीर असते. सफरचंद खाल्ल्याने यकृताचे (liver) कार्य सुधारते आणि शरीरातील कोलेस्टेरॉल नैसर्गिकरित्या कमी होण्यास मदत होते. सफरचंदा व्यतिरिक्त, आपण फायबरयुक्त पेरू किंवा व्हिटॅमिन 'सी' युक्त आवळा देखील खाऊ शकतो.
५. लसूण :- लसूण कोलेस्टेरॉल कमी करणाऱ्या सर्वोत्तम पदार्थांपैकी एक आहे. लसूण खाल्ल्याने फक्त वाईट कोलेस्ट्रॉलच कमी होत नाही, तर रक्तदाब कमी होण्यासही मदत होते. दररोज १ ते २ कच्च्या लसणाच्या पाकळ्या खाणे शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरते.