Join us

पायांच्या नसा काळ्या-निळ्या पडल्यात, फुगल्यात? वाचा काय आहे 'हा' आजार आणि याची कारणं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 10:06 IST

Varicose Veins : तुम्ही सुद्धा जास्त वेळ उभे राहत असाल किंवा जास्त वेळ बसून राहत असाल तर ही समस्या काय आहे याबाबत तुम्हाला माहीत असलं पाहिजे.

Varicose Veins : अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, काही लोकांच्या पायांच्या नसांचा रंग निळा होतो आणि नसा खूप जास्त फुगलेल्या असतात. याची कारणं वेगवेगळी असू शकतात. पण यातील एक मुख्य कारण म्हणजे जास्त वेळ उभं राहणं किंवा जास्त वेळ बसून राहणं. काही कालावधीनंतर पायांच्या नसा जास्त फुगतात आणि त्यांचा रंगही बदलतो. या समस्येला व्हेरीकोज व्हेन्स (What is Varicose Veins) असं म्हणतात. अशात तुम्ही सुद्धा जास्त वेळ उभे राहत असाल किंवा जास्त वेळ बसून राहत असाल तर ही समस्या काय आहे याबाबत तुम्हाला माहीत असलं पाहिजे.

व्हेरीकोज व्हेन्स काय आहे?

व्हेरीकोज व्हेन्सची समस्या झाल्यावर रक्त पुन्हा हृदयाकडे परत जाण्याऐवजी एकाच जागी जमा होऊ लागतं. ज्यामुळे एकाच भागावर जास्त दबाव वाढतो आणि नसा फुगून जाड होऊ लागतात. 

व्हेरीकोज व्हेन्स लक्षणं

जास्त वेळ उभं राहिल्यानं पायांमध्ये वेदना होतात आणि जड वाटू लागतात, टाचा आणि पायांच्या खालच्या भागात सूज येते, पायांमध्ये वेदना होतात,  प्रभावित नसांच्या आजूबाजूला कोरडेणा किंवा खाज येते, टाचांजवळची त्वचे कोरडी होते आणि जमखा लवकर न भरणे ही लक्षण पुन्हा पुन्हा दिसत असतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

कुणाला जास्त धोका?

व्हेरीकोज व्हेन्सची समस्या वेगवेगळ्या कारणांनी होऊ शकते. यात वाढतं वय, आनुवांशिकता किंवा हार्मोन्समध्ये बदल या गोष्टींचा समावेश आहे. त्याशिवाय लाइफस्टाईलची भूमिका देखील असते. ज्या लोकांना एकाच जागी बसून जास्त वेळ काम करावं लागतं, ज्यांना उभं राहून काम करावं लागतं, ज्या महिला अनेकदा प्रेग्नेंट राहतात, ज्यांचं वजन जास्त असतं अशांना ही समस्या अधिक होते.

जर वेळीच या समस्येवर उपाय केला गेला नाही तर समस्या अधिक जास्त वाढू शकते. जसे की, नसांमध्ये क्रोनिक समस्या होते, ज्यामुळे रक्त पुरवठा योग्यपणे होत नाही, त्वचेवर अल्सर, नसांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होणे, सूज येणे अशा समस्या वाढतात.

काय आहेत उपचार?

जर समस्या हलकी असेल किंवा सुरूवातीच्या टप्प्यात असेल तर पायी चालून, पायांचे व्यायाम करून लक्षणं कमी केली जाऊ शकतात. पण जर या गोष्टी करून आराम मिळत नसेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा.

ही समस्या दूर करण्यासाठी प्रभावी उपचार आहेत. ज्यात व्हेरीकोज व्हेन्सचा ग्लू एब्लेशन किंवा लेजर ट्रीटमेंट, तसेच रेडियोफ्रीक्वेंसी एब्लेशन, स्क्लेरोथेरपी किंवा गंभीर स्थितीत डॅमेज झालेल्या नसा सर्जरी करून काढून टाकणे यांचा समावेश आहे.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स