Join us

मणका वाकडातिकडा होणं, बाक येणं 'हा' आजार नेमका काय? वाचा लक्षणं आणि धोका टाळण्याचे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 10:58 IST

Degenerative Scoliosis : पाठीच्या कण्याचा हा एक गंभीर आजार आहे. ज्यात मणका 'S' किंवा 'C' आकाराचा होतो.

Degenerative Scoliosis : आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे नवनवीन आजार डोकं वर काढत आहेत. त्यामुळे सोशल मीडिया असेल किंवा वेगवेगळ्या हेल्थ वेबसाइट्सवर या आजारांबाबत एक्सपर्टकडून माहिती दिली जाते. जेणेकरून लोक या आजारांबाबत जागरूक असावेत. कारण काही आजार असे असतात जे कुणालाही कधीही होण्याचा धोका असतो. असाच एक आजार म्हणजे डीजनरेटिव स्कॉलियोसिस (Degenerative Scoliosis). पाठीच्या कण्याचा हा एक गंभीर आजार आहे. ज्यात मणका 'S' किंवा 'C' आकाराचा होतो. आर्टेमिस हॉस्पिटलचे डॉ. धीरज बथेजा यांनी Indiatv.in ला या आजाराबाबत माहिती दिली आहे. 

काय आहे हा आजार?

स्कोलियोसिस मणक्यासंबंधी एक गंभीर आजार आहे. हा आजार साधारणपणे ४० वयानंतर जास्त होतो आणि यात खूप वेदना सहन कराव्या लागतात. यात मणका सरळ राहण्याऐवजी 'S' किंवा 'C' आकाराचा होतो. ज्यामुळे शरीर एका बाजूला झुकतं.

काय असतात लक्षणं?

- मणका वाकल्यानं पाठीमध्ये आणि कंबरेत गंभीर वेदना होतात.

- मणक्याच्या असामान्य आकारामुळे चालण्या-फिरण्यास समस्या येते आणि स्पीडही कमी होतो.

- शरीराला संतुलन ठेवण्यास समस्या येते, ज्यामुळे पडण्याचा धोका वाढतो.

- मणका वाकल्यामुळे शरीर एका बाजूला वाकतं.

वेदना कमी करण्याचे उपाय

सकाळी स्ट्रेचिंग करा

डीजनरेटिव स्कॉलियोसिसच्या वेदना कमी करण्यासाठी रोज सकाळी स्ट्रेचिंग करणं खूप महत्वाचं ठरतं. सरळ उभे राहून हात वर करा आणि शरीर एका बाजूला वाकवून थोडा वेळ तसेच थांबा. ही प्रक्रिया दुसऱ्या बाजूने करा. 

शरीर गरम ठेवा

आपल्या रूमचं तापमान योग्य ठेवा. हिवाळ्यात बाहेर पडताना गरम कपडे घाला. याकडे जराही दुर्लक्ष केलं तर वेदना अधिक वाढू शकतात.

आहाराची काळजी घ्या

डीजनरेटिव स्कॉलियोसिसच्या रूग्णांना नेहमीच स्पायनल इन्फ्लामेशनची समस्या होते. अशात असा आहार घ्यावा ज्यामुळे इन्फ्लामेशन होणार नाही. आहारात फळं, भाज्या, गुड फॅट, बदाम आणि इतरही ड्राय फ्रूट्सचा समावेश करा. मेथी आणि दालचीनीही फायदेशीर ठरते. 

'या' गोष्टींचीही काळजी घ्या

व्हिटामिन सप्लीमेंट

डॉक्टर अनेकदा व्हिटामिन D3 घेण्याचा सल्ला देतात, कारण यानं बोन डेसिंटी वाढते आणि हाडं मजबूत होतात.

योग्य मॅट किंवा गादीचा वापर

झोपण्यासाठी योग्य मॅट किंवा गादीचा वापर केला तर वेदना कमी करता येऊ शकतात. फार नरम गादीवर झोपल्यास त्रास वाढतो. 

या काही गोष्टी फॉलो करून आपण डीजनरेटिव स्कॉलियोसिसच्या वेदना कमी करू शकता. जर वेदना होत असेल आणि हे उपाय करून आराम मिळत नसेल तर वेळीच एक्सपर्टना दाखवा.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स