Dark Yellow Urine Cause : सकाळी झोपेतून उठल्यावर अनेकदा आपण पाहिलं असेल की, लघवीचा रंग गर्द पिवळा दिसतो. पण यामुळे शरीरात काहीतरी गडबड असेल किंवा हा एखाद्या आजाराचा संकेत असेल असा विचार चुकूनही फार कुणी करत नाही. सामान्य समस्या समजून याकडे दुर्लक्ष केलं जातं. जास्तीत जास्त केसेसमध्ये शरीरात पाणी कमी झाल्यावर लघवीचा रंग गर्द पिवळा दिसतो. पण कधी कधी हा गर्द रंग एखाद्या गंभीर आजाराचा संकेतही असू शकतो.
लघवीचा रंग गर्द होण्याचं कारण
आपल्या लघवीचा रंग पिवळा यूरोक्रोम नावाच्या एका पिगमेंटमुळे होतो. हे पिगमेंट तेव्हा तयार होतं, जेव्हा शरीरात हीमोग्लोबिन तुटतं. लघवी पिवळी येण्याची कारणं
पाण्याची कमतरता
लघवीचा रंग अधिक पिवळा दिसण्याचं कॉमन कारण म्हणजे शरीरात पाणी कमी होणं. जर तुम्ही दिवसभर भरपूर पाणी पित नसाल तर लघवी सकाळी घट्ट होते आणि यूरोक्रोमचं प्रमाण जास्त दिसतं, ज्यामुळे रंग अधिक गर्द पिवळा दिसतो. रोज पुरेसं पाणी प्यायल्यानं ही समस्या दूर होऊ शकते.
काही व्हिटामिन्स आणि औषधं
काही व्हिटामिन्स किंवा सप्लीमेंट्स आपण घेत असाल तर लघवीचा रंग अधिक गर्द पिवळा किंवा चमकदार दिसू शकतो.
लिव्हरमध्ये गडबड
जर लिव्हर योग्यपणे काम करत नसेल किंवा यात काही इन्फेक्शन झालं असेल तर ते शरीरातील विषारी तत्व बरोबर बाहेर काढू शकत नाही. हे विषारी तत्व लघवीद्वारे बाहेर निघू लागतात, ज्यामुळे लघवीचा रंग गर्द पिवळा दिसतो.
किडनीमध्ये गडबड
किडनीचं काम रक्त फिल्टर करणं आणि विषारी तत्व लघवीद्वारे बाहेर काढणं असतं. जर तुम्ही डिहायड्रेट असाल म्हणजे पाणी कमी पित असाल तर किडनीला स्वत:ला साफ करण्यास अडचण होते. त्यामुळे किडनीमध्ये विषारी तत्व जमा होऊ लागतात आणि ते गर्द पिवळ्या लघवीतून बाहेर निघू लागतात. हा याचाही संकेत असू शकतो की, किडनी स्वत:ची सफाई व्यवस्थित करत नाहीये.
काय कराल उपाय?
लिव्हर आणि किडनी दोन्हींचं काम व्यवस्थित होण्यासाठी भरपूर पाणी पिणं खूप गरजेचं ठरतं. दिवसभर थोडं थोडं पाणी पित राहणं महत्वाचं आहे. केवळ पाणीच नाही तर नारळाचं पाणी, लिंबू पाणी, ताज्या फळांचा ज्यूस किंवा हर्बल चहा सुद्धा प्यावा. काही गोष्टी अशा असतात ज्या लघवीचं प्रमाण वाढवण्यास मदत करतात आणि शरीर साफ करतात. जसे की, नारळ पाणी, पुदिन्याचा ज्यूस, काकडी, कलिंगड.