Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > उन्हाळ्यात ताक प्यावं पण कधी, दुपारी-रात्री की कधीही? ताक पिण्याचा ‘हा’ नियम अजिबात विसरु नका....

उन्हाळ्यात ताक प्यावं पण कधी, दुपारी-रात्री की कधीही? ताक पिण्याचा ‘हा’ नियम अजिबात विसरु नका....

What Is The Right Time To Drink Buttermilk In Summer Benefits Of Drinking Buttermilk : What Is The Right Time To Drink Buttermilk in Summer : How Much Buttermilk Drink in A Day : उन्हाळ्यात जर आपल्या नेहमीच्या आहारात ताक घेतले तर अनेक शारीरिक समस्या कमी होतील...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2025 15:43 IST2025-04-26T15:30:23+5:302025-04-26T15:43:53+5:30

What Is The Right Time To Drink Buttermilk In Summer Benefits Of Drinking Buttermilk : What Is The Right Time To Drink Buttermilk in Summer : How Much Buttermilk Drink in A Day : उन्हाळ्यात जर आपल्या नेहमीच्या आहारात ताक घेतले तर अनेक शारीरिक समस्या कमी होतील...

What Is The Right Time To Drink Buttermilk In Summer How Much Buttermilk Drink in A Day | उन्हाळ्यात ताक प्यावं पण कधी, दुपारी-रात्री की कधीही? ताक पिण्याचा ‘हा’ नियम अजिबात विसरु नका....

उन्हाळ्यात ताक प्यावं पण कधी, दुपारी-रात्री की कधीही? ताक पिण्याचा ‘हा’ नियम अजिबात विसरु नका....

उन्हाळ्यात शरीराला आतून थंडगार ठेवण्यासाठी आपण आहारात दही - ताकाचा समावेश करतो. या दिवसांत दही - ताकासारखे पदार्थ खाणे म्हणजे आरोग्यासाठी वरदानच असते. ताकातून (What Is The Right Time To Drink Buttermilk in Summer) शरीराला बरीच पोषक तत्व मिळतात यात व्हिटामीन ए, बी, सी आणि व्हिटामीन ई मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे इम्यूनिटी वाढण्यासही मदत होते. उन्हाळ्यात (What Is The Right Time To Drink Buttermilk In Summer Benefits Of Drinking Buttermilk) बरेचदा घरोघरी हमखास ताक करुन आवडीने प्यायले जाते. उन्हाळ्यात होणाऱ्या उष्णतेच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी ताक म्हणजे सर्वोत्तम पर्याय आहे(How Much Buttermilk Drink in A Day).

उन्हाळ्यात ताक प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो तसेच अनेक शारीरिक समस्यांपासून आराम मिळतो खरा, पण ताक नेमकं कधी आणि किती प्यावं याबद्दल आपळ्याला फारशी माहिती नसते. काहीजण उन्हाळ्यात ताक प्यायचे म्हणून दिवसातून ३ ते ४ वेळा ताकच पितात, परंतु अशाप्रकारे प्रमाणापेक्षा जास्त ताक पिणे देखील आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. यासाठी उन्हाळ्यात ताक नेमकं कधी आणि किती प्यावं याच योग्य प्रमाण पाहूयात.    

उन्हाळ्याच्या दिवसांत ताक पिण्याची योग्य वेळ कोणती ?

खरंतर, उन्हाळ्याच्या दिवसांत आपण दिवसभरात कधीही ताक पिऊ शकता. परंतु ताक पिण्याची सर्वोत्तम वेळ खरी जेवणानंतरच आहे. शक्यतो, संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी ताक पिणे टाळावे. जर तुम्ही रात्रीच्या वेळी ताक पीत असाल तर तुम्हाला पोटाशी संबंधित अनेक समस्या वारंवार सतावू शकतात. 

दिवसभरात किती ग्लास ताक प्यावे ? 

कोणताही पदार्थ असो तो योग्य प्रमाणात खाल्ल्याने किंवा प्यायल्यानेच शरीराला बरेच फायदे मिळतात. एका व्यक्तीने ऊन्हाळ्याच्या दिवसांत कमीत कमी १ ते २ ग्लास पाणी प्यायला हवं. जास्त प्रमाणात ताक प्यायल्याने गॅस पोटदुखी, पोट खराब होणं, ब्लोटींग अशा समस्या उद्भवू शकतात.

उन्हाळ्यांत प्या सातूच्या पीठाचे थंडगार ताक! पोटाला थंडावा आणि शरीराला तकवा देणारा सोपा पदार्थ...

 रिकाम्या पोटी ताक पिणे योग्य की आयोग्य ? 

आपण रिकाम्या पोटी एक ग्लास ताक पिऊ शकता. रिकाम्यापोटी ताक प्यायल्यास शरीराच्या इलेक्ट्रोलाईट्वर परिणाम होतो. शरीरात एनर्जी  बुस्ट होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त पोटाच्या समस्यांपासूनही आराम मिळतो. 

थंडगार ताक पिण्याचे फायदे.... 

१. जेवणानंतर ताक पिणे ही एक चांगली सवय आहे. ताकात असणारे चांगले बॅक्टेरिया व लॅक्टिक अ‍ॅसिड हे अन्न पचविण्यासाठी तसेच मेटाबॉलिझमचा वेग सुधारण्यास उपयुक्त ठरते. यामुळेच जेवणानंतर ताक पिणे फायदेशीर ठरते. 

२. आपल्या दैनंदिन आहारात ताकाचा समावेश केल्याने पोटासंबंधीच्या अनेक तक्रारी दूर होतात. ताक प्यायल्याने अपचनाच्या समस्या निर्माण होत नाहीत. ज्या लोकांचे पोट स्वच्छ होत नाही किंवा ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, अशा लोकांनी दररोज ताक प्यावे. 

सतत एकाच जागी बसून काम करता? प्रीती झिंटाने सांगितलेला ‘हा’ सोपा व्यायाम लगेच करा...

३. प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ताक अतिशय उपयुक्त आहे. ताकामुळे आपल्याला ऊर्जा तर मिळतेच शिवाय आजारपणातून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपल्या शरीरात पुरेशी प्रतिकारशक्तीही निर्माण होते. 

४.  दह्यापेक्षा ताकामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. ताकामध्ये ९०% पाणी व पोटॅशिअमसारखे इलेक्ट्रोलेट असतात. ज्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.

Web Title: What Is The Right Time To Drink Buttermilk In Summer How Much Buttermilk Drink in A Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.