जगभरातील बऱ्याच लोकांना झोप न येण्याची समस्या उद्भवते. काहींना अंथरूणात पडल्याबरोबर लवकर झोपच येत नाही तर काहीजण गाढ झोपत नाहीत. रिसर्चनुसार ५ ते ५० टक्के लोकांना निद्रानाशाच्या समस्येचा सामना करावा लागतो. रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर केल्यानंतरही शांत झोप येत नाही.
ज्यामुळे रात्र खराब जाते तसंच दिवसही खराब जातो. दिवसभर आळस येतो. शरीर एनर्जेटीक वाटत नाही. फक्त २ मिनिटांत झोप येण्यासाठी तुम्ही मिलीट्री टेक्निकचा वापर करू शकता. मिलिट्री स्लिप मेथडमुळे तुम्हाला झटपट झोप येण्यास मदत होईल. २ मिनिटांत झोप येण्यासाठी ही मिलीट्री टेक्निक तुम्ही ट्राय करायला हवी. (What Is the Military Sleep Method OF Falling Asleep In 2 Minutes)
काय आहे मिलीट्री स्लिप मेथड
झटपट झोप येण्यासाठी वापरली जाणारी ही एक टेक्निक आहे. असं म्हटलं जातं की, अमेरिकन लष्करातील सैनिकांना युद्धाच्या काळात कोणत्याही आवाजात किंवा तणावाखाली अवघ्या २ मिनिटांत झोप लागावी यासाठी ही पद्धत विकसित करण्यात आली होती.
मिलिट्री स्लिप मेथडचा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी डोळे मिटून घ्या. कपाळ, गाल, जबड्याचे स्नायू पर्णपणे सैल सोडा. तुमच्या जिभेला देखील तोंडाच्या खालच्या बाजूला आराम द्या. खांदे शक्य तितके खाली सोडून द्या. जमिनीच्या दिशेनं पूर्णपणे सैल सोडा.
आता कंबरेपासून खालचा भाग शिथिल करा. आधी मांड्या, गुडघे, पोटऱ्या आणि शेवटी पूर्ण बोटं सैल सोडा. शरीर रिलॅक्स झाल्यानंतर मनात कोणतेही विचार येऊ देऊ नका. मन शांत ठेवण्यासाठी तुम्ही एका शांत तलावाकाठी झोपला आहात आणि वर निळं आकाश आहे अशी कल्पना करा. जास्त विचार करू नका.
ही पद्धत पहिल्याच दिवशी जमेल असं नाही. यासाठी सुमारे ६ आठवडे सराव करावा लागतो. नियमित सराव केल्यास ९० टक्के पेक्षा जास्त लोकांना अगदी बसल्या बसल्या किंवा गोंगाटातही २ मिनिटांत झोप लागू शकते. ही पद्धत विशेषत: अशा लोकांसाठी उपयुक्त आहे ज्यांना कामाच्या तणावामुळे रात्री विचार येऊन झोप लागत नाही.
Web Summary : Struggling to sleep? The military sleep method helps you fall asleep quickly. Relax your body, clear your mind, and imagine a peaceful scene. Practice for six weeks for best results. Ideal for stress-related insomnia.
Web Summary : नींद आने में परेशानी हो रही है? सैन्य नींद विधि आपको जल्दी सोने में मदद करती है। अपने शरीर को आराम दें, अपने दिमाग को शांत करें और एक शांतिपूर्ण दृश्य की कल्पना करें। सर्वोत्तम परिणामों के लिए छह सप्ताह तक अभ्यास करें। तनाव संबंधी अनिद्रा के लिए आदर्श।