Healthy Waist For Men Women: लठ्ठपणा हा अनेक गंभीर आजारांचं कारण ठरत आहे. लठ्ठपणा जर वाढला तर फक्त शरीर बेढब दिसतं असं नाही तर सोबतच हार्ट अॅटॅक, डायबिटीस आणि हाय ब्लड प्रेशरसारख्या आजारांचा देखील धोका वाढतो. मेडिकल सायन्स आणि हेल्थ एक्सपर्टचं असं मत असतं की, शरीराला सगळ्यात जास्त धोका लठ्ठपणामुळे नाही तर कंबरेच्या साइजमुळे होतो. साधारणपणे कंबरेच्या मोठ्या आकाराचा संबंध लिव्हरशी असतो. कंबरेची साइज डायबिटीस, हार्ट अॅटॅक आणि अनेक गंभीर आजारांकडे इशारा करते.
कंबरेची साइज आणि आजार
देशातील प्रसिद्ध लिव्हर स्पेशलिस्ट डॉ. सरीन सांगतात की, कंबरेचा आकार आपल्या आरोग्याबाबत बरंच काही सांगतो. खासकरून महिलांनी आपली वेस्ट आणि हिप साइज आवर्जून चेक केली पाहिजे. यात आपली कंबर आणि हिपचं प्रमाण .७ असायला हवं, म्हणजे २८ इंचाची वेस्ट आणि हिप साइज ४० पर्यंत असू शकते. पण ४० इंचाची वेस्ट आणि ४० इंचाची हिप साइज होऊ शकत नाही. जर असं झालं आरोग्यासाठी धोका वाढतो. याचा अर्थ असा होतो की, फॅट केवळ कंबरेवर नाही तर आतील अवयवांवर सुद्धा साचलेलं आहे.
कंबरेचा घेर वाढल्यास वाढतो ‘या’ आजारांचा धोका
शरीरावर साचलेली चरबी हळूहळू हृदय, लिव्हर, किडनी, मेंदू आणि रक्तवाहिन्यांचे नुकसान करते. धोक्याची बाब म्हणजे अनेकदा कोणतीही लक्षणे न दिसता शरीराच्या आत चरबी वाढत राहते. मधुमेह असलेल्या सुमारे ७० ते ८० टक्के रुग्णांमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचा हृदयरोग आढळतो. अशा लोकांची कंबर जर जास्त वाढलेली असेल, तर धोका अनेक पटींनी वाढतो.
कंबरेचा घेर किती असावा?
पुरुषांमध्ये कंबरेचा घेर ९० सेंटीमीटर म्हणजे ३५ इंचापेक्षा जास्त नसावा.
तर महिलांमध्ये कंबरेचा घेर ८५ सेंटीमीटर म्हणजे ३३ इंचापेक्षा जास्त नसावा.
कंबरेवरील चरबी कमी करण्याचा उपाय
अनेक फिटनेस एक्सपर्ट सांगतात की, जर तुम्ही रोज २० ते २५ मिनिटं सतत दोरीवरून उड्या मारण्याची सवय लावाल तर पोट आणि कंबरेवरील चरबी कमी होईल. कारण या एक्सरसाईजनं रोज २०० ते ३०० कॅलरी बर्न होतात. तसेच शरीराचा स्टॅमिनाही वाढतो.
दोरीवरून उड्या मारण्याचे फायदे
- जे लोक रोज दोरीवरून उड्या मारण्याची एक्सरसाईज करतात त्यांचं ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं.
- जर तुम्ही रोज काही मिनिटं ही एक्सरसाईज केली तर अनेक आजारांपासून तुमचा बचाव होऊ शकतो.
- दोरीवरून उड्या मारल्यानं मानसिक आरोग्यही चांगलं राहतं. कारण यानं डिप्रेशन दूर करण्यास मदत मिळते.
- दोरीवरून उड्या मारल्यानं हाडंही आणि मसल्सही मजबूत होतात.
- दोरीवरून उड्या मारल्यानं लहान मुलांची उंची वाढण्यासही मदत मिळते.
Web Summary : Waist size indicates health risks like diabetes and heart issues. Men should maintain below 35 inches, women under 33. Rope skipping helps reduce belly fat and boosts overall health.
Web Summary : कमर का आकार मधुमेह और हृदय संबंधी समस्याओं जैसे स्वास्थ्य जोखिमों को दर्शाता है। पुरुषों को 35 इंच से कम, महिलाओं को 33 इंच से कम कमर रखनी चाहिए। रस्सी कूदने से पेट की चर्बी कम होती है और समग्र स्वास्थ्य बढ़ता है।