Empty Stomach Apples Eating Benefits : आपण ऐकलं किंवा पाहिलं सुद्धा असेल की, आधीचे लोक म्हणजे आपले आजी-आजोबा भल्या पहाटे झोपेतून लवकर उठून रोजची काम करायला लागायचे. सकाळीच पौष्टिक आहारही घ्यायचे हीच त्यांची सवय त्यांची तब्येत ठणठणीत ठेवत होती. पण अलिकडची लाइफस्टाईल बरीच बदलली आहे. लोक उशिरा झोपतात आणि उशिरा झोपेतून उठतात. अनहेल्दी फूड खातात. पण जर रोज सकाळी झोपेतून उठल्यावर उपाशीपोटी एक सफरचंद खाल्लं तर शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. या सवयीनं काय काय फायदे मिळतात तेच आज आपण पाहणार आहोत.
सकाळची सुरूवात हेल्दी सवयीनं
आपल्या प्रत्येकाची सकाळची सुरूवात वेगळी असते. कोणी चहा पितात, कोणी कॉफी किंवा ग्रीन टी. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की उपाशीपोटी फक्त एक सफरचंद खाल्ल्याने तुमच्या संपूर्ण लाइफस्टाईलमध्ये पॉझिटिव्ह बदल होऊ शकतो? हे छोटंसं लाल आणि गोड फळ आपल्या रोजच्या रूटीनमध्ये मोठी एनर्जी आणि फ्रेशनेस देऊ शकतं.
पचन सुधारतं आणि एनर्जी बूस्ट
सफरचंदात असलेलं फायबर सकाळी पचनसंस्थेला अॅक्टिव्ह करतं. अनेक लोक सांगतात की त्यांनी एक महिना दररोज सकाळी सफरचंद खाण्याची सवय लावली, तर त्यांना हलकेपणा आणि एनर्जी दोन्ही जाणवले. यामुळे पोट साफ राहतं आणि दिवसाची सुरूवात चांगली होते.
फिटनेस आणि लाइफस्टाईल बॅलन्स
वर्कआउट करणाऱ्यांसाठी किंवा वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांसाठी रोज सकाळी उपाशीपोटी सफरचंद खाणं खूप फायदेशीर मानलं जातं. यातली नॅचरल शुगर आणि फायबर तुम्हाला लगेच एनर्जी देते आणि काही अनहेल्दी खाण्याची क्रेव्हिंग्स कमी करतं. ही सवय एक महिना लावल्यानंतर आपल्याला बराच फरक दिसून येईल.
हृदय आणि मूडसाठी फायदेशीर
सफरचंदाची चवच अशी आहे की खाल्ल्यानंतर मूड फ्रेश होतो. असं म्हणतात की जर दिवसाची सुरूवात हेल्दी स्नॅकने झाली, तर पुढचं खाणंही बॅलन्स राहतं. त्यामुळेच सफरचंद सकाळी उपाशीपोटी खावं.
त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर
रोज सकाळी उपाशीपोटी एक सफरचंद खाल्लं तर पोट चांगलं राहतं आणि एनर्जी तर मिळतेच, सोबतच त्वचा आणि केसांसाठी सुद्धी ही बाब फायदेशीर ठरते. यातील व्हिटामिन्स आणि अॅंटी-ऑक्सीडेंट्स त्वचेला नॅचरल ग्लो देतात आणि केस चमकदार करतात.