Join us

RO फिल्टरचं पाणी किती दिवसांनी खराब होतं? किती दिवस त्यातलं पाणी पिणं सुरक्षित असतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 20:29 IST

What Is The Expiry Date Of Ro Water : या टेक्निकनं पाण्यातील रसायनं, बॅक्टेरिया, व्हायरल, हेवी मेटल्स हटवले जातात ज्यामुळे पाणी पिण्यायोग्य होतं.

 आजकाल दुषित पाण्याची समस्या सर्वांनाच उद्भवते. दुषित पाण्यामुळे अनेक प्रकारचे इन्फेक्शियस डिसिज होऊ शकतात. हे टाळण्यासाठी रिव्हर्स ऑस्मोसिस म्हणजचे RO चं पाणी पिण्याचं प्रमाण खूपच वाढलं आहे. यातून टेक्निकली पाणी शुद्ध केलं जातं हे पाणी साफ आणि सुरक्षित मानलं जातं.पण हे पाणी किती दिवस चांगलं राहतं कधी खराब होतं  असे बरेच प्रश्न लोकांना पडतात. हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की आजकाल बरेच लोक शुद्ध पाणी पिण्यासाठी RO सिस्टिमचा वापर करतात. (What Is The Expiry Date Of Ro Water)

या टेक्निकनं पाण्यातील रसायनं, बॅक्टेरिया, व्हायरल, हेवी मेटल्स हटवले जातात ज्यामुळे पाणी पिण्यायोग्य होतं. पण RO चं पाणी  नेहमी सुरक्षित राहत नाही. जर तुम्ही हे पाणी स्वच्छ भांड्यात काढून ठेवले आणि थंड जागेवर ठेवले तर १ ते २ दिवस सुरक्षित राहतं. त्यानंतर यात बॅक्टेरिया, सुक्ष्म जिवाणू वाढतात. RO फिल्टरमुळे पाण्यातील विरघळलेले घन पदार्थ क्षार आणि रसायने काढून टाकली जातात, ज्यामुळे पाण्याची चव सुधारते आणि त्याला गंध येत नाही. (What Is The Expiry Date Of Ro Water How Long It Safe To Drink)

२ मिनिटांत भरपूर पीठ मळण्याची पाहा १ सोपी ट्रिक, चपात्याही होती मऊ-फुगतील टम्म

RO च्या पाण्यात मिनरल्सचे प्रमाण कमी असते कारण शुद्धीकरणाच्या प्रोसेसमध्ये मिनरल्ससुद्धा काढून टाकले जातात. यामुळे पाणी लवकर खराब होते. जर तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा फ्रिजमध्ये हे पाणी ठेवले तर ७ ते १० दिवस चांगले राहते. पण याची चव, गुणवत्ता बदलू शकते हे पाणी पिण्यायोग्य राहत नाही. याच्या सेवनानं पोटाच्या समस्याही टाळता येतात. आवश्यक खनिजे कमी झाल्यामुळे, विशेषत: दीर्घकाळ हेच पाणी प्यायल्यास, शरीरात खनिजांची कमतरता निर्माण होऊ शकते.

करिना कपूरच्या डायटिशियन ऋजुता दिवेकर सांगतात नवरात्रीत खा ४ पदार्थ; उपवास बाधणार नाही

महिनोंमहिने जुनं RO चं पाणी पिणं सुरक्षित नाही. कोणत्याही कंटेनरमध्ये किंवा बॉटलमध्ये पॅक केलेले असले तरी. यात  बॅक्टेरिया, फंगस, इतर सुक्ष्म जीव तयार होतात. यामुळे उलट्या जुलाब अशा समस्या उद्भवतात. म्हणून महिनाभर जुनं RO चं पाणी पिणं टाळायला हवं. रोज नवीन पाणी भरून प्या.

English
हिंदी सारांश
Web Title : How long is RO filter water safe to drink?

Web Summary : RO water is safe for 1-2 days if stored properly. Bacteria can grow quickly. Storing it in an airtight container in the fridge extends its life to 7-10 days, but its quality may change. Avoid drinking month-old RO water due to potential health risks.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य