Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सकाळी झोपेतून उठताच बदललेली असते तोंडाची चव? पाहा पुन्हा पुन्हा का होत राहतो चवीमध्ये बदल

सकाळी झोपेतून उठताच बदललेली असते तोंडाची चव? पाहा पुन्हा पुन्हा का होत राहतो चवीमध्ये बदल

तोंडाची चव बदलण्याचं मुख्य कारण पचन तंत्रात बिघाड असू शकतं. इतकंच नाही तर एखाद्या समस्येचा संकेत असू शकतो. तो काय हे जाणून घेऊया.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 09:56 IST2026-04-12T09:55:53+5:302026-04-12T09:56:32+5:30

तोंडाची चव बदलण्याचं मुख्य कारण पचन तंत्रात बिघाड असू शकतं. इतकंच नाही तर एखाद्या समस्येचा संकेत असू शकतो. तो काय हे जाणून घेऊया.

What is the causes of mouth taste changes in morning | सकाळी झोपेतून उठताच बदललेली असते तोंडाची चव? पाहा पुन्हा पुन्हा का होत राहतो चवीमध्ये बदल

सकाळी झोपेतून उठताच बदललेली असते तोंडाची चव? पाहा पुन्हा पुन्हा का होत राहतो चवीमध्ये बदल

सकाळी झोपेतून उठल्यावर तोंडाची चव फारच वेगळी असते. आपल्याला असंही जाणवलं असेल की, रोज सकाळी तोंडाची चव वेगवेगळी असते. पण असं होणं चांगलं नाही. कडू, तुरट किंवा वेगळंच काहीतरी जाणवणं हा शरीरातील एखाद्या मोठ्या गडबडीचा संकेत असू शकतो. तोंडाची चव बदलण्याचं मुख्य कारण पचन तंत्रात बिघाड असू शकतं. इतकंच नाही तर एखाद्या समस्येचा संकेत असू शकतो. तो काय हे जाणून घेऊया.

कशामुळे बिघडते तोंडाची चव?

तोंडाची चव जर पुन्हा पुन्हा बिघडत असेल तर याची कारणं वेगवेगळी असू शकतात. ज्यात पचन समस्या, लिव्हरसंबंधी समस्या, तोंडाची अस्वच्छता आणि जास्त गॅस आणि अॅसिड तयार होणं यांचा समावेश आहे. जेव्हा शरीरात विषारी तत्वांचं प्रमाण वाढतं तेव्हा तोंडाची चव बिघडते. यामुळे आंबट ढेकरी सुद्धा येऊ लागतात. जे चव बदलण्याचं मु्ख्य कारण आहे.

लिव्हरमुळे बदलते तोंडाची चव 

लिव्हरचा काम करण्याचा स्पीड जेव्हा कमी होतो, तेव्हा तोंडाची चव बदलू शकते. कारण लिव्हरचं काम कमी झाल्याने रक्त जास्त शुद्ध होत नाही. तसेच लिव्हर अन्न पचनासाठी आवश्यक एंझाइमही तयार करू शकत नाही. याचा थेट परिणाम पचन तंत्रावर होतो, ज्यामुळे तोंडाची चव बदलते. इतकंच नाही तर बद्धकोष्ठतेची समस्या झाली असेल तेव्हा सुद्धा तोंडाच्या चवीत बदल होतो आणि सकाळी झोपेतून उठताच तोंडाची दुर्गंधी येऊ लागते.

तोंडाची चव बदलण्याचं आणखी एक कारण म्हणजे बरेच लोक मसालेदार आणि तळलेलं काही खाल्ल्यानंतर तोंडाची व्यवस्थित स्वच्छता करत नाही. ज्यामुळे तोंडात अडकून असलेले कण पोटात जातात. याने चव आणि पचन दोन्ही प्रभावित होतात. यामुळे भूक कमी लागते. 

तोंडाची चव सुधारण्याचा आयुर्वेदिक उपाय

तोंडाची चव सुधारायची असेल तर रात्री त्रिपळा चूर्ण घेतल्यास फायदा मिळेल. याने पोट चांगल्या पद्धतीने साफ होईल आणि शरीरातील विषारी तत्वही सहजपणे बाहेर पडतील. पोट साफ असेल तर तोंडाची चव देखील संतुलित राहणार. तसेच तोंडाची चव चांगली ठेवण्यासाठी बडीशेपही खाऊ शकता. याने पोट थंड राहणार आणि तोंडाची टेस्टही चांगली राहणार. इतकंच नाही तर भूकही लागेल.

Web Title : सुबह उठने के बाद मुँह का स्वाद क्यों बदल जाता है?

Web Summary : सुबह उठने के बाद स्वाद में बदलाव पाचन, लिवर की समस्या या खराब मौखिक स्वच्छता का संकेत है। विषाक्त पदार्थ, लिवर फंक्शन और कब्ज स्वाद को प्रभावित करते हैं। त्रिफला और सौंफ जैसे आयुर्वेदिक उपचार स्वाद और पाचन को बेहतर बनाने में मदद कर सकते हैं।

Web Title : Why does your mouth taste change after waking up?

Web Summary : Changing taste after waking up signals digestive issues, liver problems, or poor oral hygiene. Toxins, liver function, and constipation affect taste. Ayurvedic remedies like Triphala and fennel can help improve taste and digestion.