दातांमध्ये पिवळेपणा येणं ही एक सामान्य समस्या आहे. ज्यामुळे बरेच लोक त्रस्त असतात. पिवळे दात कोणालाही आवडत नाहीत. दातांमध्ये पिवळेपणा आल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात. (What Is the Best Way To Whiten Teeth) कारण दात, हिरड्यांमध्ये फसलेले कण सडून प्लाक तयार होते. ज्यामुळे तोंडाला दुर्गंधी येणं, दातांमधून रक्त येणं, पायरिया, हिरड्यांमध्ये वेदना, दातांमध्ये किड लागणं, दात हलणं, कॅव्हिटीज अशा समस्या उद्भवू शकतात. (Home Remedy For Remove Plaque From Teeth At Home)
नंतर टार्टरच्या स्वरूपात दातांच्या मुळात ते जातं त्यामुळे इतर समस्या सुरू होतात. दात, हिरड्या निरोगी ठेवण्यासाठी प्लाक कमी करणं गरजेचं असतं. जे नॉर्मल टुथपेस्टमुळे हटत नाही. दातांना स्वच्छ करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. (What Is the Best Way To Whiten Teeth Home Remedy For Remove Plaque From Teeth At Home)
हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अर्धा चमचा नारळाचं तेल, अर्धा चमचा बेकिंग सोडा, अर्धा चमचा हळद, अर्धा लिंबू हे साहित्य लागेल. एका वाटीत नारळाचं तेल, बेकिंग सोडा, हळद पावडर घ्या, यात थोडी रोज वापरली जाणारी टुथपेस्ट घाला. यात लिंबाचा रस घालून मिक्स करा, ज्यामुळे दात स्वच्छ होतील.
हा उपाय कधी करावा?
हा उपाय तुम्ही आठवड्यातून २ वेळा करू शकता. यासाठी सकाळच्यावेळी दात स्वच्छ ठेवा. हे मिश्रण वापरल्यास पिवळ्या दातांपासून सुटका मिळेल आणि काही दिवसांत दात पांढरे होतील. आठवड्यातून दोनवेळा हे मिश्रण दातांना लावल्यानं दात आणि हिरड्या मजबूत होतील आणि प्लाक निघून जाण्यास मदत होईल. तोंडाची पीएच लेव्हल मेंटेन राहण्यास मदत होईल. कॅव्हिटीज व दातांच्या वेदनांपासून आराम मिळेल. याशिवाय काहीही खाल्ल्यानंतर दात स्वच्छ करायला विसरू नका. दिवसातून २ ते ३ वेळा ब्रश करा.