Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > हिवाळ्यात रामबाण आहे पेरु! फक्त 'या' वेळी खा, सर्दी-खोकल्यापासून मिळेल आराम

हिवाळ्यात रामबाण आहे पेरु! फक्त 'या' वेळी खा, सर्दी-खोकल्यापासून मिळेल आराम

Guava benefits in winter: Health benefits of guava: Eating guava in winter: योग्य वेळी पेरु खाल्ल्यास सर्दी- खोकल्यापासून आपल्याला नक्कीच आराम मिळेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2025 12:03 IST2025-10-30T12:03:16+5:302025-10-30T12:03:48+5:30

Guava benefits in winter: Health benefits of guava: Eating guava in winter: योग्य वेळी पेरु खाल्ल्यास सर्दी- खोकल्यापासून आपल्याला नक्कीच आराम मिळेल.

What is the best time to eat guava for health benefits Can guava help in curing cold and cough naturally Why guava is the best fruit to eat during winter season | हिवाळ्यात रामबाण आहे पेरु! फक्त 'या' वेळी खा, सर्दी-खोकल्यापासून मिळेल आराम

हिवाळ्यात रामबाण आहे पेरु! फक्त 'या' वेळी खा, सर्दी-खोकल्यापासून मिळेल आराम

हिवाळा सुरु झाला की आपल्याला बाजारात सर्वत्र पेरु पाहायला मिळतात. गोडसर, थोडासा तुरट, आतून लाल असलेला पेरु हा फक्त चवीपुरताच नाही तर आरोग्यासाठी देखील चांगला असतो.(Guava benefits in winter) या ऋतूमध्ये अनेकांना सर्दी खोकल्याचा त्रास होतो.(Health benefits of guava) अतिभूक लागण्याच्या शक्यतेमुळे वजन वाढण्याची समस्या देखील उद्भवते.(Eating guava in winter) या काळात अशी अनेक फळ असतात जी आपल्या शरीराला थंडावा देतात. या फळांना चुकीच्या वेळी खाल्ल्याने आपल्याला सर्दी-खोकल्यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यातील एक पेरु. (Guava for cold and cough)
अनेकदा आई-आजी आपल्याला हिवाळ्यात पेरु न खाण्याचा सल्ला देते.(Best time to eat guava) वातावरणातील गारवा आणि पेरु थंड असल्यामुळे सर्दी-खोकल्यासारखे आजार होण्याची शक्यता जास्त असते.(Guava for immunity) त्यामुळे अनेकजण पेरु कमी प्रमाणात खातात. पण योग्य वेळी खाल्ल्यास सर्दी- खोकल्यापासून आपल्याला नक्कीच आराम मिळेल. (Winter fruits for immunity)

१५ मिनिटांत करा सालाच्या मूगडाळीचा कुरकुरीत खाकरा! पौष्टिक आणि कुरकुरीत खाकरा लगेच होईल फस्त

पाहायला गेलं तर फळं आपण कोणत्याही वेळी खाऊ शकतो. पण काही आंबट फळे ही अनोशीपोटी न खाण्याचा सल्ला आपल्याला डॉक्टर देतात. पण भरपूर पोषण असणारी फळं खाण्यासाठी देखील एक वेळ असते. डॉक्टरांच्या मते पेरुमध्ये व्हिटॅमिन सी, ए, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असते. हिवाळ्यात सर्दी-खोकल्याचा त्रास वाढतो, त्यावर पेरु नैसर्गिक उपाय म्हणून चांगला आहे. पण याचं योग्य वेळी सेवन करणं देखील गरजेचं आहे. सकाळी रिकाम्या पोटी किंवा थंड पाण्यासोबत पेरू खाल्ल्यास सर्दी वाढू शकते. त्यामुळे दुपारी जेवणानंतर किंवा संध्याकाळच्या वेळी पेरू खाणं अधिक चांगलं असतं.

पेरुमध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवून शरीराला अनेक संसर्गापासून वाचवतं. शिवाय पोटाच्या समस्या बद्धकोष्ठता, गॅस किंवा अपचन यावरही पेरु रामबाण उपाय आहे. हिवाळ्यात त्वता रुक्ष होणे, लूज मोशनच्या समस्या होत असतील तर पेरुमधील फायबर आणि नैसर्गिक हायड्रेशन शरीराला संतुलित ठेवण्याचे काम करतात.  

पेरु खाण्याची देखील योग्य पद्धत असते. पूर्ण पिकलेला पण जास्त मऊ नसलेला पेरु निवडायला हवा. काही लोक पेरुला मीठ- मिरपूड लावून खातात ज्यामुळे पचनसंस्था अधिक सक्रिय होते. दररोज एक पेरू खाल्ल्याने आपल्याला हिवाळ्यात सर्दी-खोकल्याचा त्रास कमी जाणवेल आणि शरीरही चांगले राहील.

Web Title : अमरूद: सर्दियों का रामबाण! सर्दी से राहत के लिए सही समय पर खाएं।

Web Summary : अमरूद सर्दियों में फायदेमंद है, प्रतिरक्षा को बढ़ाता है और पाचन में मदद करता है। इसे खाली पेट या ठंडे पानी के साथ खाने से बचें। सर्दी और खांसी से राहत पाने के लिए अमरूद का सेवन दोपहर के भोजन के बाद या शाम को करना सबसे अच्छा है।

Web Title : Guava: A winter superfood! Eat it right for cold relief.

Web Summary : Guava is beneficial in winter, boosting immunity and aiding digestion. Avoid eating it on an empty stomach or with cold water. The best time to consume guava is after lunch or in the evening to relieve cold and cough.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.