Join us

दह्यात 'या' चारपैकी कोणतीही १ गोष्ट कालवून खा, वजन होईल कमी अन् हाडंही होतील मजबूत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 15:37 IST

Health Tips : अनेकांना दही खाण्याची योग्य पद्धत माहीत नसते. जर योग्य पद्धतीनं दही खाल तर त्याचे जास्त फायदे मिलू शकतात.

Health Tips : भरपूर लोक रोज आवडीनं दही खातात. दही खायला तर टेस्टी लागतंच, सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. दह्यामध्ये गुड बॅक्टेरिया असतात, ज्यामुळे पोटासंबंधी अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते. तसेच दह्यात प्रोटीन, कॅल्शिअम, व्हिटॅमिन, मिनरल्स भरपूर असतात. पण अनेकांना दही खाण्याची योग्य पद्धत माहीत नसते. जर योग्य पद्धतीनं दही खाल तर त्याचे जास्त फायदे मिलू शकतात.

आयुर्वेद डॉक्टर रेखा राधामोनी यांनी दही खाण्याची योग्य पद्धत सांगितली आहे. याबाबतचा एक व्हिडीओ त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. त्यांनी दह्यात काय टाकून खावं? कोणत्या वेळी दही खावं आणि कोणत्या लोकांनी खावं? याबाबत माहिती दिली आहे.

दह्याचे फायदे

डॉक्टर रेखा यांनी सांगितलं की, जर योग्य व्यक्तीनं योग्य वेळी दही खाल्लं तर यापासून अनेक फायदे मिळू शकतात. ज्यामुळे वात संतुलित होतो, शुक्राणुंची गुणवत्ता सुधारते आणि हाडं मजबूत होतात. हे दह्याचे मुख्य फायदे आहेत.

दही लवकर कसं पचवाल?

दह्यात सैंधव मीठ, काळी मिरी, मद आणि तूप टाकून खायला हवं. या चारपैकी कोणतीही एक गोष्ट दह्यात टाकल्यानं दही लवकर पचतं. काळी मिरीनं आणि सैंधव मिटामुळे मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. ज्यामुळे वजन लवकर कमी होण्यास मदत मिलते.

कुणी खावं दही?

नियमितपणे एक्सरसाईज करणारे किंवा चांगली भूक असलेल्या लोकांसाठी दही फायदेशीर असतं. ज्या लोकांना गॅस, ब्लोटिंग, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता, स्किन डिजीज आहेत आणि जे लठ्ठपणा, जास्त वजनानं हैराण आहेत ते सुद्धा दही खाऊ शकतात. 

कोणत्या वेळी खावं दही?

जास्तीत जास्त लोकांना दही खाण्याची योग्य वेळच माहीत नसते.  ज्यामुळे सर्दी, खोकला, गॅस, पोटदुखी अशा समस्या होतात. आयुर्वेद डॉक्टरांनुसार, दही केवळ दुपारी खावं. यावेळे शिवाय कोणत्याही वेळी दही खाऊ नये.

वजन कमी करण्यासाठी काय?

जर तुमचं वजन वाढलेलं असेल, लठ्ठपणा असेल किंवा अन्न व्यवस्थित पचन होत नसेल तर दही खाऊ नका. दह्याऐवजी तुम्ही ताक पिऊ शकता. यातही भरपूर प्रमाणात प्रोबायोटिक असतात. सोबतच कॅल्शिअम, प्रोटीनही असतं. ज्यामुळे पचन चांगलं होतं.  

टॅग्स : वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्स