गॅस बद्धकोष्टता या पोटाच्या अशा समस्या आहेत ज्यात मलत्याग करण्यात अडचणी येतात. गॅस झाल्यास मल कडक होतो आणि तासनतास टॉयलेटमध्ये बसून राहावं लागतं. (Constipation Home Remedy) जर तुम्ही खूपच जोर लावून मल बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर रक्तसुद्धा येऊ शकतं. मुळव्याधासारख्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो.
जर तुम्ही कॉस्टिपेशनच्या त्रासाने वैतागला असाल किंवा सतत गॅस होत असेल तर रात्री दूध पिणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. पण साधं दूध न घेता दुधासोबत काही पदार्थ मिसळून खाल्ल्यास सकाळी पोट साफ होण्यास मदत होते. (What Is The Best Drink For Constipation)
बिम्रिघम गॅस्ट्रोइंट्रोलॉजीच्या रिपोर्टनुसार रोजच्या आहारात खजूर, चिया सिड्स, किव्ही, कॉफी, प्रोबायोटीक फूड यांचा समावेश केला तर गुड बॅक्टेरियाज वाढतात आणि आतडे निरोगी राहते. जर्नल ऑफ रिनल न्युट्रिशननुसार रोज ऑलिव्ह ऑईलचे सेवन केल्यानं कॉस्टिपेशनपासून आराम मिळतो (Ref). आतड्यातून मल सहज पुढे ढकलला जातो. ऑलिव्ह ऑईलमधील हेल्दी फॅट्स हार्ट डिसिजचा धोका कमी करतात. कोलेस्टेरॉल, ओबेसिटीचा धोकाही उद्भवत नाही.
दूध आणि तूप
दूध आणि तूप (Milk And Ghee) हे असं कॉम्बिनेशन आहे ज्यामुळे गॅसेसचा त्रास उद्भवत नाही. यासाठी 1 कप दूध गरम करून त्यात 1 चमचा तूप मिसळा. त्यात 1 चमचा तूप मिसळा. रात्री झोपण्याआधी हे दूध प्या. दूध जेंटल लेक्सेटिव्हप्रमाणे काम करते. यात एक चमचा तूप मिसळा. तूप मिसळलेलं हे दूध रात्रीच्यावेळी प्या. ज्यामुळे मल मुलायम बनतो आणि मलत्याग करणं सोपं होतं. पोट सहज साफ होण्यासही मदत होते. (What foods are good for constipation?)
लिंबू पाणी
गॅसेसपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही लिंबू पाणी पिऊ शकता. एक ग्लास गरम पाण्यात लिंबाचा रस घालून प्या. हे गरम लिंबू पाणी प्यायल्यानं शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघण्यास मदत होते आणि शरीर हायड्रेट राहते.
दही आणि आळशीच्या बिया
एक वाटी दही घ्या त्यात आळशीच्या बीया घाला. दही आणि आळशीच्या बिया नॅच्युरल लॅक्सेटिव्हप्रमाणे काम करतात. आळशीच्या बियांमधील फायबर्स मल सहज बाहेर काढण्यास मदत करतात.ज्यामुळे मलत्याग करणं सोपं होतं.
कॅस्टर ऑईल
कॅस्टर ऑईल रोज नाही पण कधीतरी तुम्ही याचे सेवन करू शकता. हे तेल लॅक्सेटिव्ह प्रमाणे काम करते. गॅसेसपासून आराम मिळवण्यासाठी एक चमचा कॅस्टर ऑईल पिऊ शकता. सतत प्यायल्यास पोटाच्या नॅच्युरल प्रक्रियेत व्यत्यय येऊ शकतो.