Join us

१० पैकी ६ जणांच्या डोक्यात होतो सतत कोंडा, हा स्काल्प सोरायसिस तर नाही! बघा लक्षणं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2025 14:35 IST

What Is Scalp Psoriasis: तुमच्या डोक्यात जर नेहमीच खूप कोंडा होत असेल तर तो स्काल्प सोरायसिसचा एक प्रकार तर नाही ना हे एकदा तपासून घ्यायला हवं (what is the difference between normal dandruff and scalp psoriasis?)

ठळक मुद्दे स्काल्प सोरायसिस हे एक व्हायरल, बॅक्टेरियल इन्फेक्शन असून औषधोपचारांनी ते बरे होऊ शकते.

अनेक जणांच्या डोक्यामध्ये नेहमीच खूप कोंडा असतो. हिवाळ्यात कोंड्याचे प्रमाण वाढते हे सहाजिक आहे. पण ते जर प्रमाणाबाहेर वाढत असेल तर मात्र वैद्यकीय सल्ला घेण्याची तुम्हाला गरज आहे. कारण स्काल्प सोरायसिस हा प्रकार वाढत असून डोक्यात कोंडा असणाऱ्या १० पैकी ६ जणांना हा त्वचाविकार असतो, असं तज्ज्ञ सांगत आहेत (What Is Scalp Psoriasis?). हा आजार नेमका काय आहे (what is the difference between normal dandruff and scalp psoriasis?) आणि डोक्यात नेहमी होणारा कोंडा आणि स्काल्प सोरायसिस या दोघांमधला फरक कसा ओळखायचा ते आता पाहूया.. 

 

स्काल्प सोरायसिस म्हणजे काय?

स्काल्प सोरायसिस हे एक व्हायरल, बॅक्टेरियल इन्फेक्शन असून औषधोपचारांनी ते बरे होऊ शकते. या रुग्णांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती सामान्य त्वचेच्या पेशींवर हल्ला करत असल्याने जळजळ होते.

झाडू दरवाजाच्या मागे, कोपऱ्यात ठेवता? फक्त १८८ रुपयांत बदलेल घराचा लूक, आणा हे झाडू होल्डर

टाळूवरील त्वचेच्या पेशी खूप लवकर पुनरुत्पादित होतात. त्यामुळे त्वचेवर पांढरट जाड ठिपके तयार होतात. त्वचेला खूप खाज येते. तसेच बऱ्याच जणांना त्यातून खूप वेदनाही होतात. कपाळ, मान, कानाच्या मागचा भाग या ठिकाणी हे चट्टे जास्त प्रमाणात आढळतात. तसेच कोणत्याही वयाच्या व्यक्तींना हा आजार होऊ शकतो.

 

स्काल्प सोरायसिसची लक्षणे काय?

१. डोक्यामध्ये खूप जास्त प्रमाणात कोंडा होतो. डोक्याच्या त्वचेवरून पांढरट बुरशीचे अक्षरशः पापुद्रे निघतात. 

२. काही पापुद्रे तर जाडसर आणि फुगलेलेही असू शकतात. त्यामुळे डोक्याच्या त्वचेचा काही भाग पुर्णपणे झाकला जातो. 

रोज सुर्यफुलाच्या चमचाभर बिया खा, वजन कमी होऊन त्वचा आणि केसही होतील सुंदर...

३. टाळूवरची त्वचा खूप कोरडी पडते आणि तिला खूप खाज सुटते. 

४. डोक्यात जखमा होऊन त्यातून बऱ्याचदा रक्तस्त्रावही होतो.

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सत्वचेची काळजीकेसांची काळजी