Health Tips : आपल्यासोबत नेहमीच अशा गोष्टी घडत असतात, ज्या शरीरात होत असलेल्या गडबडीचे संकेत देत असतात. त्यामुळे या गोष्टींकडे वेळीच लक्ष दिलं पाहिजे. कारण दुर्लक्ष केलं तर समस्या गंभीर झालेली असू शकते. अशीच एक गोष्ट म्हणजे अचानक उठून उभे राहिल्यावर डोकं गरगरणं किंवा चक्कर येणं. आपण अनेकदा अनुभव असेल की, जेव्हा आपण जास्त लेटलेले असतो किंवा बसलेले असतो तेव्हा अचानक उठून उभे झाल्यावर चक्कर येते. अचानक कमजोरी जाणवते किंवा धुसर दिसू लागतं. असं जर होत असेल वेळीच याकडे लक्ष दिलं पाहिजे.
अचानक उठून उभे झाल्यावर चक्कर येण्याला हेल्थ एक्सपर्ट एकाप्रकारचं लो ब्लड प्रेशर मानलं जातं. याला मेडिकल भाषेत ऑर्थोस्टेटिक हायपोटेंशन म्हणतात. अशात चला पाहुया हे काय असतं आणि यापासून बचाव कसा करावा.
अचानक चक्कर किंवा बेशुद्ध पडण्याची समस्या सामान्यपणे वृद्धांमध्ये बघायला मिळते. गरमीमुळे सुद्धा असं होऊ शकतं. त्याशिवाय डिहायड्रेशनमुळे असं होऊ शकतं. तसेच जर तुम्ही काही कोणती औषधं घेत असाल तर त्यामुळे सुद्धा उठून उभे झाल्यावर तुम्हाला अचानक चक्कर येऊ शकते.
याच्या लक्षणांमध्ये चक्कर येण्यासोबतच डोकं गरगरणं, धुसर दिसणं, अचानक थकवा आणि कमजोरी असेही संकेत कॉमन आहेत. ऑर्थोस्टेटिक हायपोटेंशनच्या स्थितीत ही सगळी लक्षणं दिसतात. कधी कधी ही समस्या होणं कॉमन असू शकता. पण जर पुन्हा पुन्हा होत असेल तर हा धोक्याचा इशारा असू शकतो.
जर तुमच्यासोबतही असं होत असेल तर अचानक उठून उभे राहण्याऐवजी हळूहळू उभे रहा. त्याशिवाय दिवसभर हायड्रेट राहण्यासाठी भरपूर पाणी प्या. नियमितपणे व्यायाम करा. जेणेकरून ब्लड फ्लो चांगला रहावा.