Join us

जेट लॅगचा त्रास कुणाला जास्त होतो कुणाला कमी, असं का? काही लोकांसाठी ठरतो धोकादायक कारण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 14:28 IST

What Is Jet lag : आता अनेकांना हेही माहीत नाही की, जेट लॅगची समस्या म्हणजे काय? तर हाच मुद्दा आज आपण समजून घेणार आहोत.

What Is Jet lag : आजकाल प्रवासाची वेळ खूप जास्त वाढली आहे. कामासाठी असो वा फिरायला जाण्यासाठी असो. बरेच लोक परदेशात फिरायला जातात किंवा भारतातील वेगळ्या ठिकाणांवर फिरायला जातात. यासाठी विमानाचा देखील वापर वाढला आहे. पण अनेकांना हे माहीत की, विमान प्रवास वाढल्यामुळे लोकांमध्ये जेट लॅगची समस्या कॉमन झाली आहे. आता अनेकांना हेही माहीत नाही की, जेट लॅगची समस्या म्हणजे काय? तर हाच मुद्दा आज आपण समजून घेणार आहोत.

बघायला तर जेट लॅग ही काही तशी मोठी गंभीर समस्या नाही. पण यामुळे बॉडी क्लॉक म्हणजे शरीराचं सर्केडियन रिदम बिघडतं. ज्याचा परिणाम असा होतो की, आपल्याला झोपेसंबंधी समस्या होतात, भूकेसंबंधी समस्या होतात आणि एनर्जीवरही याचा प्रभाव पडतो.

काय आहे जेट लॅग?

एक्सपर्ट सांगतात की, जेट लॅगला झोपेसंबंधी एक समस्या मानलं जातं. ही समस्या तेव्हा होते जेव्हा एखादी व्यक्ती अनेकदा वेगवेगळे टाइम झोन पार करते. त्यामुळे याचा शरीरावर प्रभाव पडून बॉडी क्लॉक आणि स्थानिक वेळेतील ताळमेळ बिघडतो. ज्यामुळे झोपेचा पॅटर्न बिघडतो.

काय असतात याची लक्षणं

जेट लॅगची लक्षणं वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये वेगवेगळी दिसतात. अनेकांना झोप न येण्याची समस्या होते, दिवसा खूप थकवा जाणवतो. फोकस करण्यात समस्या होते. पोटासंबंधी समस्या होतात, मूड स्विंग होतात आणि चिडचिडपणाही वाढतो.

कुणाला असतो जास्त धोका?

- वाढत्या वयासोबतच शरीराचं तंत्र जरा बिघडतं. त्यामुळे वयोवृद्ध लोकांना जेट लॅगची समस्या अधिक होऊ शकते.

- ज्या लोकांना आधीच झोपेसंबंधी समस्या आहेत किंवा स्लीप डिसऑर्डर आहे, त्यांच्यावरही याचा प्रभाव अधिक दिसतो.

- तसेच लोक नेहमीच विमानानं लांबचा प्रवास करतात, त्यांना सुद्धा जेट लॅगचा अधिक सामना करावा लागू शकतो.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य