Join us
Daily Top 2 Weekly Top 5

हर्नियाचं दुखणं कधी मागे लागलं कळणारही नाही, छळतील वेदना; पाहा हर्नियाची गंभीर लक्षणं आणि उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 14:18 IST

Hernia Causes and symptoms : शरीराचा एखादा भाग जर सामान्यापेक्षा अधिक वाढला तर तो हर्निया आहे. हा शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकतो. पण पोटात होणारा हर्निया प्रामुख्याने बघितला जातो. हर्नियामुळे होणाऱ्या वेदना असह्य असतात.

Hernia Causes and symptoms : हर्निया हा एक अनेकांमध्ये आढळणारा गंभीर आजार आहे. हर्निया म्हणजेच फक्त तीव्र वेदना अशी अनेकांची समजूत असते. पण प्रत्यक्षात अनेक वेळा हर्निया वेदनांशिवायही होऊ शकतो. अनेकांना तर हर्निया काय आहे हेही माहीत नसतं. डॉक्टर सांगतात की, जेव्हा पोटातील स्नायू कमजोर होतात. तेव्हा आतडी किंवा फॅटी टिश्यू त्या कमकुवत जागेतून बाहेर फुगू लागतात, तेव्हा हर्निया होतो. आधी हा त्रास वेदनारहित असतो, त्यामुळे अनेक रुग्ण त्याकडे दुर्लक्ष करतात आणि उपचार उशिरा होतात.

वेदना न होणाऱ्या हर्नियाची लक्षणं

वेदना नसलेला हर्निया हळूहळू वाढतो आणि त्याची सुरुवातीची लक्षणे अतिशय सामान्य असतात. उभं राहिल्यावर, खोकताना, शिंकताना किंवा जड वजन उचलताना पोट, नाभी किंवा मांडीजवळ हलका त्रास होणे हे सर्वात सामान्य लक्षण आहे. याशिवाय पोटात जडपणा, ताण जाणवणे, जास्त वेळ उभं राहिल्यावर अस्वस्थता, गॅस होणे, बद्धकोष्ठता किंवा वारंवार पोट फुगणे अशा तक्रारीही दिसू शकतात.

कोणाला जास्त धोका असतो?

ज्यांच्या पोटाच्या स्नायूंमध्ये कमजोरी असते, त्यांना हर्नियाचा धोका अधिक असतो. यामध्ये खालील काही कारणे असू शकतात.

लठ्ठपणा

वाढतं वय

वारंवार जड वस्तू उचलणे

दीर्घकाळ खोकला

बद्धकोष्ठतेत जास्त जोर लावणे

गर्भधारणा

प्रोस्टेटशी संबंधित समस्या

पोटाची जुनी शस्त्रक्रिया

साधारणपणे पुरुषांमध्ये मांडीजवळ तर महिलांमध्ये नाभीजवळ हर्निया जास्त आढळतो.

हर्निया कधी धोकादायक बनतो?

जर वेदनारहित हर्नियामध्ये अचानक तीव्र वेदना, सूज, उलटी, ताप अशी लक्षणे दिसली, तर ही स्थिती धोकादायक ठरू शकते. याला स्ट्रॅंग्युलेटेड हर्निया म्हणतात. यात आतड्यांचा रक्तपुरवठा थांबण्याचा गंभीर धोका असतो आणि ही एक तातडीची वैद्यकीय स्थिती असते.

वेळेवर उपचार का गरजेचे?

हर्निया आपोआप बरा होत नाही, उलट तो हळूहळू वाढत जातो. त्यामुळे कोणतीही असामान्य सूज किंवा दीर्घकाळची तक्रार दुर्लक्षित केल्यास गुंतागुंत वाढू शकते. सुरुवातीच्या टप्प्यात तपासणी आणि योग्य वेळी उपचार केल्यास धोका टाळता येतो आणि शस्त्रक्रियाही तुलनेने सोपी व सुरक्षित होते.

हर्नियापासून कसा कराल बचाव

- मलाशयाची योग्यप्रकारे स्वच्छता करा.

- लठ्ठपणा आणि वजन वाढू देऊ नका.

- प्रोटीन आणि व्हिटामिन सी सप्लीमेंटचं सेवन करा.

- आरामदायक अंडरगारमेंट्सचा वापर करा.

- पोटाच्या स्नायूंवर अधिक दबाव टाकणारी कामे करू नये.

- वजन संतुलित ठेवले पाहिजे.

- जर पोटाची आणि अपचनाची समस्या असेल तर वेळीच उपाय करा.

हर्नियामध्ये काय काळजी घ्यावी?

१) कोणतीही वस्तू योग्य पद्धतीने उचलावी. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसारच वजन उचला.

२) वजन वाढू देऊ नका. वजन वाढल्यास तुमची समस्या अधिक वाढू शकते. जर तुमचं वजन जास्त असेल तर ते कमी करण्याचा प्रयत्न करा. तज्ज्ञांकडून योग्य आहार प्लॅन करुन घ्या.

३) पोटदुखी तुमची वेदना, त्रास आणि आजार वाढवू शकते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये पचनक्रिया बिघडू देऊ नका. तुमच्या आहारात फायबरचं प्रमाण अधिक वाढवा. सोबतच हलक्या पदार्थांचं सेवन करा.

English
हिंदी सारांश
Web Title : Hernia: Causes, symptoms, and preventive measures you should know.

Web Summary : Hernias can occur without pain, often due to weakened abdominal muscles. Symptoms include discomfort when standing or coughing. Obesity, age, and heavy lifting increase risk. Early detection and treatment are crucial to avoid complications. Maintain a healthy weight and proper lifting techniques for prevention.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य